DRDO: डीआरडीओमध्ये २०० अप्रेंटिस पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया-drdo apprentice recruitment 2024 apply for 200 posts at drdo gov in details here ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DRDO: डीआरडीओमध्ये २०० अप्रेंटिस पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया

DRDO: डीआरडीओमध्ये २०० अप्रेंटिस पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया

Sep 29, 2024 10:52 AM IST

DRDO Apprentice Recruitment: डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती
डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती

DRDO Apprentice Recruitment 2024: डीआरडीओने अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली. पात्र उमेदवार डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत अप्रेंटिसची विविध पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सुमारे २१ दिवसांच्या आत आपला अर्ज सादर करू शकतात. तर, या भरती मोहिमेत जवळपास २०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.  या भरती अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू झाली. 

रिक्त पदांचा तपशील

पदवीधर अप्रेंटिस: ४० जागा

टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा): ४० जागा

ट्रेड अप्रेंटिस आयटीआय पास आउट (एनसीव्हीटी / एससीव्हीटी संलग्नता): १२० जागा

वयोमर्यादा

या डीआरडीओ भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांचे वय कमीतकमी १८ वर्षे (१ ऑगस्ट २०२४ रोजी) असणे आवश्यक आहे.  

शैक्षणिक पात्रता

वर्ष २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये (पदवी, पदविका आणि आयटीआय ट्रेड अप्रेंटिस) सारख्या परीक्षा उत्तीर्ण आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र मानले जातील. या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी आपण खाली दिलेली अधिसूचना पाहू शकता.

निवड प्रक्रिया 

पात्र उमेदवारांची निवड डीआरडीओमधील अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.  शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना अर्जात दिलेल्या ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल. त्याचबरोबर उमेदवारांना जॉईनिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दरम्यान कागदपत्रांच्या मूळ आणि स्वप्रमाणित प्रती सोबत आणाव्यात लागतील. डीआरडीओ अप्रेंटिस भरती २०२४ शी संबंधित इतर माहितीसाठी अधिकृत वेबसाइट drdo.gov.in भेट द्या.  

एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आता कृषी विभागातील रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयानुसार, १डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेत कृषी उपसंचालकाची ४८ पदे, तालुका कृषी अधिकारी ५३ पदे आणि कृषी अधिकाऱ्यांची १५७ पदे समाविष्ट केली आहेत.

Whats_app_banner