मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  द्रौपदी मुर्मू यांचा विजय.. बनले ‘हे’ ५ रेकॉर्ड, देशाच्या सर्वात तरुण राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांचा विजय.. बनले ‘हे’ ५ रेकॉर्ड, देशाच्या सर्वात तरुण राष्ट्रपती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 21, 2022 10:52 PM IST

द्रौपदी मुर्मू देशाच्यासर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या सर्वात तरुणआदिवासी महिलाठरल्या आहेत. या विजयाबरोबरच त्यांनी इतिहास रचला आहे.

द्रौपदी मुर्मू
द्रौपदी मुर्मू

देशात पार पडलेल्या १५ व्या राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठा विजय मिळवला आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपला पराभव स्वीकार केला करत त्यांनी द्रौपदी मुर्मू यांचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. दरम्यान द्रौपदी मुर्मू देशाच्या  सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या सर्वात तरुण आदिवासी महिला ठरल्या आहेत. या विजया बरोबरच त्यांनी इतिहास रचला आहे. 

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाने पाच विक्रम प्रस्तापित केले आहेत.

देशाला पहिल्यांच आदिवासी राष्ट्रपती - 
देशाला विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि के. आर. नारायणन यांच्या रुपाने दोन दलित राष्ट्रपती मिळाले आहे. मात्र द्रौपदी मुर्मू देशातील पहिल्या आदिवासी नेत्या आहेत, ज्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. आजपर्यंत देशात कोणताही आदिवासी नेता पंतप्रधान बनला आहे न गृहमंत्री. ओडिशामध्ये जन्म झालेल्या द्रौपदी मुर्मू २०१५ ते २०२१ पर्यंत झारखंडच्या राज्यपाल होत्या. त्या पहिल्याच राज्यपाल होत्या, ज्यांनी झारखंडमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केला. 

सर्वात तरुण राष्ट्रपती - 
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला होता. २५ जुलै रोजी त्यांचे वय ६४ वर्षे १ महिना आणि ८ दिवस असेल. द्रौपदी मुर्मू आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती ठरणार आहेत. यापूर्वी हा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. ते जेव्हा राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांचे वय ६४ वर्षे २ महिने व ६ दिवस होते. ते बिनविरोध राष्ट्रपती नियुक्त झाले होते. सर्वात अधिक वयामध्ये राष्ट्रपती बनण्याचा विक्रम के. आर. नारायणन यांच्या नावावर आहे. ते ७७ वर्षे ५ महिने व २१ दिवस वयाचे असताना राष्ट्रपती बनले होते. 

स्वतंत्र भारतात जन्म झालेल्या राष्ट्रपती –

द्रौपदी मुर्मू पहिल्या राष्ट्रपती असतील ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला होता. विशेष म्हणजे २०१४ पर्यंत जितके पंतप्रधान व राष्ट्रपती बनले त्यांचा जन्म भारत स्वतंत्र होण्याच्या आधी झाला होता. पंतप्रधान मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला आहे. ते पहिलेच पंतप्रधान आहेत, ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. 

ओडिशा राज्यातून पहिल्या राष्ट्रपती
देशात आतापर्यंत जे १४ राष्ट्रपती झाले आहेत, त्यापैकी ७ राष्ट्रपती दक्षिण भारतातील होते. दरम्यान डॉ. राजेंद्र प्रसाद दोन वेळा राष्ट्रपती बनले ते बिहारचे रहिवाशी होते. द्रौपदी मुर्मू ओडिशा राज्यातील पहिल्या नेत्या आहेत, ज्या देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्या देशातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. २००७ मध्ये प्रतिभा  देवी सिंह पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या होत्या.

राष्ट्रपती बनलेल्या पहिल्या नगरसेवक - 
द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती बनलेल्या पहिल्या अशा नेत्या आहेत, ज्या आधी आमदार राहिल्या आहेत.  द्रौपदी मुर्मू सर्वात आधी एक शिक्षिका होत्या. त्यानंतर १९९७ मध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर २००० साली त्या आमदार म्हणून विधानसभेत पोहोचल्या.  ओडिशात भाजपा-बीजेडी सरकारमध्ये त्या दोन वेळा मंत्री होत्या. 

 

WhatsApp channel