Manmohan Singh Love Story: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवार रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली असून ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवठाही जाहीर करण्यात आला आहे.२ वेळा देशाचे नेतृत्व केलेल्या डॉ. मनमोहन सिंग य़ांच्या पश्चात पत्नी आणि ३ मुली आहेत. शांत व संयमी स्वभावाच्या डॉ सिंग य़ांच्या मनात प्रेमाचे वादळ उठले होते, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा गुरुशरण कौर यांना पाहिले होते. जाणून घेऊया माजी पंतप्रधानांनी प्रेमकहाणी व वैवाहिक जीवन.
डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण सिंग इतिहासच्या प्रोफेसर, लेखिका आणि कीर्तन गायिका आहेत. त्याचबरोबर त्या कुशल गृहिणीही आहेत. डॉक्टर सिंह यांच्या जीवनात त्यांचे स्थान एक मजबूत सहचारिणी व प्रेरणास्रोतचे राहिले आहे. १९५७ मध्ये मनमोहन सिंग जेव्हा केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेऊन भारतात आले होते, तेव्हा त्यांच्या कुटूंबाला त्यांच्या लग्नाची चिंता सतावत होती. कुटूंबाने त्यांच्यासाठी मुली पाहणे सुरू केले होते. साधे व सरळ जीवन जगणाऱ्या मनमोहन सिंग यांना अरेंज मॅरेजबाबत काहीच हरकत नव्हती. मात्र त्यांची एकच इच्छा होती, मुलगी चांगली शिकलेली हवी.
सांगितले जाते की, मनमोहन सिंग यांच्या कुटूंबाने त्यांच्यासाठी एका श्रीमंत मुलीचे स्थळ पाहिले होते. तिच्याकडून मोठा हुंडाही मिळणार होता. मात्र मुलगी शिकलेली नव्हती. मनमोहन सिंग यांना कुटूंबाने या मुलीबाबत सांगितले की, तिच्याकडून खूप मोठा हुंडा मिळणार आहे. मात्र त्यांनी लग्नाला तत्काळ नकार दिला. त्यांनी म्हटले की, हुंडा नको मला शिकलेली मुलगी हवी.
या दरम्यान बसंत यांना मनमोहन सिंग यांच्याबाबत समजले व त्यांनी आपली लहान बहीण कीर्तन गायिका गुरुशरण कौर हिचे स्थळ घेऊन ते सिंग यांच्या घरी गेले. त्यानंतर दोघांच्या भेटीची वेळ ठरवली गेली. गुरुशरण सिंग पहिल्यांदा पांढऱ्या सलवार-कुर्तीमध्ये मनमोहन सिंग यांना भेटायला गेल्या होत्या. घराच्या छतावर दोघांची भेट झाली. या भेटीनंतर मनमोहन सिंग यांनी लग्नाला होकार दिला.
सांगितले जाते की, एका संगीत कार्यक्रमात गुरुशरण कौर यांनी कीर्तन गायले होते. त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना पाहिले होते. लग्नासाठी शिकलेली मुलगी हवी अशी इच्छा असलेल्या मनमोहन सिंग यांना समजले होते की, गुरुशरण इतिहास मध्ये एमए करत आहेत. मात्र या इवेंट मध्ये एक घटना घडली. गुरुशरण सिंग य़ांच्या गुरुने म्हटले की, त्यांनी चांगले गीत गायले नाही. त्यावर मनमोहन सिंग म्हणाले होते की, नाही गुरुजी, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गायले.
या घटनेनंतर मनमोहन यांनी गुरुशरण सिंग यांना आपल्या घरी ब्रेकफास्ट साठी बोलावले. त्यांना इंग्रजी ब्रेकफास्ट म्हणजे अंडी आणि टोस्ट देऊन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला होता. याचा खुलासा स्वत: गुरुशरण सिंग यांनी एका मुलाखतीत केला होता. दोघे एकमेकांना पसंत करत होते. त्यांच्या नात्याला कुटूंबीयांचाही विरोध नव्हता. १९५८ मध्ये दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. त्यांना तीन मुली आहेत.
मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी गुरशरण यांचा जन्मही पाकिस्तानात झाला होता. भारत-पाक विभाजनानंतर त्यांचे कुटूंब भारतात आले. त्यांच्या जन्म बुमराह-शेलचे इंजिनिअर सरदार चतर सिंग कोहली आणि भगवंती कौर यांच्या घरी झाला होता. त्या सात भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या. त्या जालंधर रेडिओ स्टेशनमध्ये कार्यक्रम करत होत्या.
डॉ. मनमोहन सिंग आणि गुरुशरण यांती प्रेम कहाणी एक मजबूत नाते, एकमेकांचा आदर, विश्वास आणि सहयोगाचे उत्तम उदाहरण आहे. दोघांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतारात एकमेकांची साथ दिली. त्यांचे नाते आजच्या पीढीसाठी प्रेरणास्तोत्र आहे की, साधेपमा व समर्पण भावनेने एक मजबूत व आनंदी जीवन कसे जगले जाऊ शकते.
संबंधित बातम्या