lucknow double murder : उत्तर प्रदेशातील मोहनलालगंजमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या आई-वडिलांना हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाचा शोध सुरू आहे. मालमत्तेच्या वादातून मुलाने मुलाने आपल्याच आई वडिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
लखनऊच्या मोहनलालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरौली गावात ही घटना घडली आहे. जगदीश वर्मा (वय ७०) आणि त्यांची पत्नी शिवप्यारी (वय ६८) हे त्यांच्या गावात राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव बृश्कीत उर्फ लाला आणि धाकट्या मुलाचे नाव देवदत्त आहे. जगदीश वर्मा हे व्यवसायाने लोहार होते. असे सांगितले जात आहे की, त्यांचा मोठा मुलगा बृश्कीत याच्यासोबत मालमत्तेवरून अनेक दिवसांपासून वाद होता. या कारणामुळे घरात वारंवार भांडणे होत होती.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश आणि शिवप्यारी यांचे शनिवारी रात्री उशिरा मोठा मुलगा लाला याच्याशी भांडण झाले. दरम्यान, मुलाने रागाच्या भरात हातोड्याने आई वडिलांवर वार करण्यास सुरुवात केली. मुलाने केलेल्या मारहाणीमुळे वेदनेने आई-वडील ओरडू लागले. मात्र, तरीसुद्धा आरोपी मुलाला दया आली नाही. या घटनेत जगदीश व शिवप्यारी हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी जखमी वृद्ध दाम्पत्याला मोहनलालगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) दाखल केले. त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी दोघांनाही ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. मात्र, येथे उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. मोहनलालगंजचे एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
संबंधित बातम्या