रस्त्याच्या कडेला स्टॉल, दरमहा ६ लाख रुपये कमाई, ऐकून सरकारी कर्मचाऱ्यांनीही मारला डोक्यावर हात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रस्त्याच्या कडेला स्टॉल, दरमहा ६ लाख रुपये कमाई, ऐकून सरकारी कर्मचाऱ्यांनीही मारला डोक्यावर हात

रस्त्याच्या कडेला स्टॉल, दरमहा ६ लाख रुपये कमाई, ऐकून सरकारी कर्मचाऱ्यांनीही मारला डोक्यावर हात

Dec 12, 2024 05:24 PM IST

Special Story: सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकजण धडपड करत असतात. परंतु, रस्त्याच्या कडेला स्टॉल लावलेला व्यक्ती दरमहा ६ लाख रुपये कमवतो, हे ऐकल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून 'हा' व्यक्ती दरमहा कमवतो ६ लाख, असं काय विकतो? वाचून बसेल धक्का!
रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून 'हा' व्यक्ती दरमहा कमवतो ६ लाख, असं काय विकतो? वाचून बसेल धक्का!

Dosa Seller Earn More Than 6 lakh Per Month: सरकारी नोकरीच्या आशेवर असलेल्या आणि खासगी नोकरी करून दरमहा ५० हजारांपेक्षा अधिक पैसे कमवणाऱ्यांना लाजवेल अशी माहिती समोर आली. एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला डोसा विकून दररोज २० हजार रुपये कमावतो म्हणजेच त्याची मासिक कमाई ६ लाख रुपये आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

दर महिन्याला ६ लाख रुपयांची कमाई

नवीन कोप्पाराम या ट्विटर वापरकर्त्याने नुकतीच एक पोस्ट केली. कोप्पाराम आपल्या पोस्टमध्ये सरकारी नोकरी आणि खाजगी नोकरी करणाऱ्यांपेक्षा रस्त्यावर स्टॉल लावणारा व्यक्ती अधिक पैसा कमावत असल्याचे म्हटले आहे. कोप्पाराम यांच्या घराशेजारी एक डोसा विक्रेता आहे, जो दररोज २० हजार रुपयांची कमाई करतो म्हणजेच त्याची मासिक कमाई ६ लाख रुपये आहे. या व्यवसायासाठी लागलेले भांडवल वजा केले तर तो दरमहा तीन ते साडेतीन लाख कमावतो आणि करही भरत नाही.

पगारदार कर्मचाऱ्यांशी केली तुलना

दरमहा ६०,००० रुपये कमावणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्याशी तुलना केल्याने वाद आणखी वाढला. कोप्पाराम पुढे म्हणाला की, दरमहा ६० हजार पगार मिळवतात, त्यांना आपल्या उत्पन्नाच्या सुमारे १० टक्के कर भरावा लागतो. तर, रस्त्यावर स्टॉल लावून कमाई करणारा व्यक्ती करमुक्त असतात.

नेटकऱ्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

@naveenkopparam या ट्वीटर अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली. या पोस्टला आतापर्यंत एक मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. तर, मोठ्या प्रमाणात लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगले उदाहरण आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'आता राजीनामा देण्याची वेळ आली आहे.' तर, दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'मी तर आता शिक्षण सोडून डोसाचे स्टॉल विकायचे ठरवले आहे.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर