मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचे दरवाजे आजपासून सर्वांसाठी खुले! अशा प्रकारे घेता येईल रामलल्लाचे दर्शन

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचे दरवाजे आजपासून सर्वांसाठी खुले! अशा प्रकारे घेता येईल रामलल्लाचे दर्शन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2024 08:20 AM IST

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्याची सर्वसामान्यांची इच्छा आजपासून पूर्ण होणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर मंगळवारी मंदिराचे दरवाजे आज पासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

Ram mandir Pran Pratishtha
Ram mandir Pran Pratishtha

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर बांधलेल्या राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठापणा सोहळा जल्लोषात पार पडला. यानंतर रामलल्लाचे दर्शन घेण्याची सर्वसामान्यांची इच्छा आजपासून पूर्ण होणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर आज पासून मंदीराचे दरवाजे हे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

earthquake in delhi : राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरली; ७.२ रिश्टरस्केलची तीव्रता

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहल्यानंतर देशभरात प्रचंड जल्लोष साजरा करण्यात आला. देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम, शोभा यात्रा, मिरवणुका काढण्यात आल्या. अयोध्येत भाविकांचा महापूर आला आहे. राम मंदिरात रामललाची पूजा करण्याचे नियम ठरले आहेत. यासाठी श्री रामोपासना नावाची संहिता तयार करण्यात आली आहे. नियमानुसार पहाटे ३ वाजल्यापासून पूजा व सजावटीची तयारी सुरू करण्यात आली. रामलल्लाला ४ वाजता जाग आल्यावर दर तासाला फळे आणि दूध अर्पण करण्यात येणार आहेत. अयोध्येत दररोज दीड लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेता प्रत्येक भाविकाला रामललाच्या दर्शनासाठी केवळ १५ ते २० सेकंदांचा अवधी मिळणार आहे.

Maharashtra Weather Update : विदर्भात आज अवकाळी पावसाची शक्यता! थंडीत होणार वाढ, मुंबई, पुण्यात गारठा वाढला

सकाळी सातपासूनच दर्शनाला सुरुवात

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटनुसार सकाळी आणि संध्याकाळी ९.३० तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ११.३० आणि नंतर दुपारी २ ते ७ या वेळेत रामलल्लाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

आरतीसाठी करावे लागेल बुकिंग

सकाळच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी आगाऊ बुकिंग करणे आवश्यक आहे. त्या दिवशी संध्याकाळच्या आरतीसाठी बुकिंगही करता येणार आहे. आरतीला उपस्थित राहण्यासाठी भाविकांना पास दिले जातील. जवळच्या श्री रामजन्मभूमीच्या कॅम्प ऑफिसमध्ये ही पास देण्याची सोय करण्यात आली आहे. आरती सुरू होण्याच्या अर्धा तास आधी हे पास दिले जाणार आहेत. पाससाठी भाविकांना सरकारी ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे संकेतस्थळ येथूनही हे पास मिळवता येणार आहे.

मोफत दिला जाणार पास

आरती पास विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्तांना पास मोफत देण्यात येणार आहे. सध्या फक्त ३० जणांनाच एक वेळच्या आरतीसाठी पास दिले जाणार आहेत.

अ‍ॅप मदत करेल

अयोध्या विकास प्राधिकरणाने पर्यटन-केंद्रित मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे, ज्यामुळे भाविकांना अयोध्येत जाणे सोपे होणार आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यात अयोध्येतील प्रमुख ठिकाणे, वाहतूक, नकाशा आणि थांबण्याची ठिकाणे यांची माहिती असेल. अ‍ॅपची 3D नकाशा सेवा शहरातील भविष्यातील पायाभूत सुविधांमध्ये करण्यात आलेले बदलांची माहिती भाविकांना घेता येणार आहे. या अ‍ॅपद्वारे भाविकांना अयोध्येतील विविध मंदिरांचे आभासी दर्शनही घेता येणार आहे.

पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार

या मांदरियायत पूर्वेकडून प्रवेश तर दक्षिणेकडून बाहेर पडता येणार आहे. मुख्य मंदिरात जाण्यासाठी ३२ पायऱ्या चढून जावे लागते. मुख्य गर्भगृहात भगवान श्री राम यांचे बालस्वरूप आणि पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असेल. दक्षिण-पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तेथे जटायूची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

श्री रामजन्मभूमी संकुलातील कुबेर नवरत्न टिळा आणि त्यावरील कुबेरेश्वर महादेव मंदिराचेही जीर्णोद्धार करण्यात आले. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी देवाची पूजा करून करण्यात आले. आता सर्वसामान्य भाविकांनाही येथे दर्शन घेता येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी अमेरिकेसह अनेक देशांत रामनामाचा गजर झाला. अमेरिकेतील, न्यूयॉर्कच्या आयकॉनिक टाइम्स स्क्वेअरसह देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मेक्सिकोमध्येही नव्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. कॅरिबियन देश त्रिनिदाद टोबॅगो येथे हजारो लोकांनी एकत्र येऊन दिवे प्रकाशित केले. कॅनडा आणि मॉरिशसमध्येही नागरिकांनी जल्लोष साजरा केला.

 

WhatsApp channel