कर्नाटकची राजधानी बेंगळुरुच्या केआर पुरममध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांच्या कारच्या उघडलेल्या दरवाजाला धडकून मोटारसायकलस्वार रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना केआर पुरम परिसरातील गणेश मंदिराजवळ घडली. मृत तरुणाचे नाव प्रकाश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री शोभा करंदलाजे कारच्या आतमध्ये होत्या व निवडणूक प्रचारासाठी जात होत्या. रस्त्यात मंत्र्यांच्या कारचा दरवाजा उघडताच मोटारसायकलस्वार प्रकाश कारच्या दरवाजाला धडकला व रस्त्यावर कोसळला. त्यानंतर मागून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. दरम्यान हे अजून स्पष्ट झाले नाही की, कारचा दरवाजा करंदलाजे यांनी उघडला होता की, अन्य कोणी उघडला होता. या प्रकरणी मंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
बेंगळुरु वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री लोकसभा निवडणूक प्रचारासाठी जात होत्या. दरम्यान त्या आपल्या फॉरच्यूनर कारमधून उतरून एका गल्लीत निवडणूक प्रचारासाठी गेल्या. त्यानंतर काही वेळानंतर गाडीत बसलेल्या चालकाने अचानक दरवाजा उघडला. त्यामुळे पाठीमागून येत असलेले ६२ वर्षीय प्रकाश होंडा आपल्या स्कूटीसह कोसळले. त्यावेळी त्यांना ट्रकने चिरले. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
एका धार्मिक कार्यक्रमावेळी १०० फुटांहून अधिक उंचीची भलामोठा रथ भाविकांवर कोसळला.बेंगळुरूजवळच्या हुस्कुर मदुरम्मा मंदिराच्या जत्रेवेळी ही दुर्घटना घडली. या यात्रेनिमित्त बाहेर काढलेला १२० फूट अधिक उंचीचा रथ ७ एप्रिल रोजी गर्दीच्या वेळी अचानक कोसळला. यावेळी रथाच्या भोवती भाविकांची मोठी गर्दी होती. रथ कोसळल्यानंतर लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागली. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी तसेच दुखापत झाली नाही. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.