donald trump us presidency Election : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येऊ लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांच्याविरोधात विजय मिळवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, "हा आमच्यासाठी एक शानदार विजय आहे ज्यामुळे आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिननंद केलं आहे. ट्रम्प यांनी बहुमताचा २७० चा आकडा पार पडला आहे. त्यांना २७७ जागा मिळाल्या आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत झाली. या निवडणुकीत आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प लढणार होते. मात्र, ऐनवेळी बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस व डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या जनमत चाचणीमध्ये जवळपास समसमान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना पराभूत करून अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी यापूर्वीच रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीत ट्रम्प हॅरिस यांच्याविरोधात मोठा विजय मिळला असल्याचं मीडिया हाऊसचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांनी हॅरिस यांचा पराभव केल्याचा अंदाज फॉक्स न्यूज डिसिजन डेस्कने वर्तवला आहे. चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांनी नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन, पेन्सिल्व्हेनिया आणि जॉर्जिया सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवत २७० इलेक्टोरल मतांचा जादुई आकडा ट्रम्प यांनी गाठला आहे. फॉक्स न्यूजने विस्कॉन्सिन ट्रम्प पुढे असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा विजय निश्चित मानल्या जात होता. मात्र, विजेत्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. हॅरिस यांच्यातुलनेत ट्रम्प यांची मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. तर विजयासाठी २७० जागांची गरज आहे. तर हॅरिस २१४ जागांवर मते मिळाली आहे. हॅरिस यांनी हार्वर्ड विद्यापीठातील भाषणाचा कार्यक्रमही रद्द केला आहे. सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आहे. हा अमेरिकन जनतेचा शानदार विजय असल्याचं त्यांनी म्हटल आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मोहिमेला त्यांनी जगातील सर्वात मोठी राजकीय चळवळ असे संबोधले. आम्ही आपला देश, सीमा निश्चित करणार आहोत. आज रात्री आम्ही इतिहास रचला. आम्ही सर्वात अविश्वसनीय राजकीय विजय मिळवला आहे. मी अमेरिकेतील जनतेचे आभार मानतो. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी लढणार असल्याचं ट्रम्प यांनी अमेरिकन नागरीकांशी संवाद साधतांना म्हटलं आहे.