मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ट्रम्प लागले २०२४ च्या तयारीला, २ वर्षे आधीच केली घोषणा

ट्रम्प लागले २०२४ च्या तयारीला, २ वर्षे आधीच केली घोषणा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 16, 2022 10:19 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, "अमेरिकेला पुन्हा महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी आज मी संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारीची घोषणा करत आहे."

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (AP)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अजून बराच अवधी आहे. दरम्यान, दोन वर्षे आधीच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उमेदवारीची घोषणा केलीय. मंगळवारी त्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत. ट्रम्प यांनी सांगितलं की, "आता तुम्ही जास्त वेळ शांत राहू शकत नाही." गेल्या निवडणुकीत ट्रम्प यांना ज्यो बायडेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

मध्यावधी निवडणुकीआधी त्यांनी उमेदवारीबाबत घोषणा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या समर्थक उमेदवारांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता तरीही ट्रम्प यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कारी लेक आणि डॉक्टर ओज उम्र मेहमत ओज यांसारख्या दिग्गजांना एरिझोना आणि पेन्सिलवेनियामध्ये पराभूत व्हावं लागलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, "अमेरिकेला पुन्हा महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी आज मी संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारीची घोषणा करत आहे." दोन वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे बायडेन यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यानंतर अमेरिकेत अनेक नाट्यमय घडामोडीही घडल्या होत्या.

ट्रम्प म्हणाले की, आम्ही मिळून भ्रष्टाचाराचा सामना करू. देश सध्या अडचणीत आहे. कोणत्याही राजकीय नेत्याचे किंवा पारंपरिक उमेदवाराचे काम नाही. हे काम एक महान असा आंदोलनाचे आहे जे अमेरिक लोकांच्या धाडसाचं, विश्वासाचं आणि भावनेचं प्रतिक आहे.

WhatsApp channel

विभाग