Porn Star Stormy Daniels on Donald Trump : प्रसिद्ध पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. २०१६ मध्ये ट्रम्प यांचे एका पॉर्न स्टारसोबत असलेले संबंध उघड झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांचे हे संबंध लपवण्यासाठी ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मीला १ लाख ३० हजार डॉलर्स दिले होते. या प्रकरणी स्टॉर्मीने अमेरिकन कोर्टात साक्ष दिली आहे. मंगळवारी न्यायालयात तिने दोघांचे शारीरिक संबंध व पैसे घेण्याबाबत झालेल्या व्यवहाराबद्दल माहिती दिली.
पॉर्न स्टार स्टॉर्मीने कोर्टात दिलेल्या साक्षीदरम्यान, दोघांच्याही नात्याच्या अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. डॅनियल्सने ट्रम्पसोबत घालवलेल्या एका रात्रीबाबत कोर्टात तपशीलवार माहिती दिली आहे. स्टॉर्मीने कोर्टात सांगितले की जेव्हा ती ट्रम्प यांच्या बाथरूममध्ये गेली तेव्हा तिला तिची टॉयलेटरी बॅग दिसली, ज्यामध्ये ओल्ड स्पाइस आणि पर्ट प्लस आणि सोन्याचे चिमटे ठेवले दिसले.
पॉर्न स्टार स्टॉर्मी आणि ट्रम्प यांचे संबंध उघड झाल्याने अमेरिकेत मोठा गदारोळ झाला होता. या मुळे ट्रम्प अडचणीत आले होते. सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोघांच्या संबंधाबाबत सुरू असलेल्या एका खटल्यात पॉर्न स्टार स्टॉर्मीने कोर्टात मंगळवारी साक्ष दिली. दरम्यान, ट्रम्प यांनी डॅनियलसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा नकार दिला आहे. कोर्टात, डॅनियल्सने सांगितले की जेव्हा तिने ट्रम्पला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ट्रम्प यांनी सिल्क किंवा साटनचा पायजामा घातला होता, ज्यामुळे त्यांची प्लेबॉय मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर यांनी थट्टा उडवली होती.
डॅनियल्सने सांगितले की तिने ट्रम्प यांना ड्रेस बदलण्यास सांगितला. त्यांनी नम्रपणे ड्रेस बदलण्यास होकार दिला. डॅनियल्सने सांगितले की ट्रम्प यांनी तिला पॉर्न इंडस्ट्रीबद्दल माहिती विचारली. दोघांमध्ये ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांच्याबाबत देखील संक्षिप्त चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या वैवाहिक जिवणाबद्दल डॅनियल्सला माहिती दिली. ट्रम्प आणि त्यांची पत्नी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतात असे त्यांनी तिला संगितले.
ट्रम्प हे बॉक्सर आणि टी-शर्टमध्ये बेडवर आले. डॅनियल्सने सांगितले की ती त्यावेळी शांत होती आणि ट्रम्प यांच्या कडून तिला धोका वाटत नव्हता. डॅनियल्सने जेव्हा ट्रम्प यांच्या खोलीतील टॉयलेट वापरले, तेव्हा तेथे असणाऱ्या टॉयलेटरी बॅगेत सोन्याचे चिमटे आणि ओल्ड स्पाइस आणि पर्ट प्लसच्या महागड्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
पॉर्न स्टार स्टॉर्मीने साक्ष दिली की ट्रम्प यांनी कंडोम घातलेला नव्हता. तिथून निघताना ट्रम्प यांनी तिला हनीबंचला बोलावून लवकरच भेटण्याचे आश्वासन दिले. ट्रम्प यांच्याशी तिची शेवटची भेट २०११ मध्ये झाली होती. डॅनियल्सला तिच्या एका मित्राने दोघांच्या भेटीची बातमी एका मासिकात प्रकाशित झाल्याची माहिती दिली.
डॅनियल्स म्हणली की, २००७ च्या उन्हाळ्यात लॉस एंजेलिसमध्ये एका भेटीदरम्यान, ट्रम्प यांनी पुन्हा तिच्याशी शरीर संबंध ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु तिने मासिक पाळीचे कारण देत नकार दिला होता.
यापूर्वी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार होप हिक्स त्यांच्या खटल्यात साक्षीदार म्हणून हजर झाले होते. व्हाईट हाऊसचे संप्रेषण संचालक म्हणून काम केलेले हिक्स हे या प्रकरणात साक्ष देणारे ट्रम्पचे पहिले जवळचे सल्लागार आहेत. हिक्स यांनी ट्रम्प यांच्या २०१६ मध्ये प्रेस सेक्रेटरी म्हणून काम केले. २०१६ च्या निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी "ऍक्सेस हॉलीवूड" टेप लीक झाल्यानंतर त्याच्या वैवाहिक जीवनाबाबत अनेक वृत्त प्रसिद्ध झाले होते.
संबंधित बातम्या