Donald Trump Oath Ceremony Update: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे.व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प चार वर्षाच्या अंतराने दुसऱ्यांदा पोहोचल्यानेपुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प राज सुरु झालं आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेताच सात तोफांची सलामी देण्यात आली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुपारी १२ वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता) शपथ घेतली. अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची शपथ ही अमेरिकेच्या संसदेत पार पडली. कारण अमेरिकेत कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे अमेरिकेन संसदेत या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या सर्वोच्च पदावरील त्यांचा हा दुसरा कार्यकाळ असेल, ज्यात ते अमेरिकन संस्थांना नव्याने आकार देणार आहेत. ट्रम्प यांच्याआधी जे. डी. व्हॅन्स यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळवत इतिहास रचला होता. ते अमेरिकेत दुसऱ्यांदा सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत.
कडाक्याच्या थंडीमुळे ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा बंद जागेत पार पडला. त्यांनी शपथ घेताच अमेरिकेत पुन्हा एकदा 'ट्रम्प राज' सुरू झाले आहे. शपथविधीनंतर सात तोफांची सलामीही देण्यात आली.
राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प विक्रम प्रस्थापित केला. पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच ट्रम्प १०० हून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. यात इमिग्रेशन, हवामान, ऊर्जा धोरण आणि फेडरल सरकारमधील विविधता उपक्रमांचा समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 'माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन. दोन्ही देशांचा फायदा व्हावा आणि जगाचे चांगले भवितव्य घडावे यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. तुमच्या आगामी यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो, असे त्यांनी सोमवारी सांगितले. ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ट्रम्प यांचे सहकारी आणि मित्र एलन मस्क, मेटाचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि अनेक उद्योगपतीही पोहोचले होते.
संबंधित बातम्या