Donald Trump Salary : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. कमला हॅरिस यांचा पराभव करून त्यांनी हा विजय मिळवला आहे. ट्रम्प पुढील जानेवारीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. यानंतर त्यांना भरपूर पगार आणि सुविधा मिळणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पगार किती पगार मिळणार माहित आहे का? याशिवाय त्यांना आणखी अनेक मोफत सुविधा देखील दिल्या जाणार आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना किती पगार मिळणार व त्यांना कोणत्या सुविधा मिळणार यावर एक नजर टाकूयात .…!
ट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार 'सेक्स स्ट्राइक'वर; फोर बी चळवळ केली सुरू
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना वार्षिक ४ लाख डॉलर पगार मिळणार आहे. जर तुम्ही त्याचे पैशात रुपांतर केल्यास त्यांना दरमहा ३.३७ कोटी रुपये इतका पगार मिळणार आहे. याशिवाय ट्रम्प यांना अतिरिक्त खर्चापोटी स्वतंत्रपणे ५० हजार डॉलर्स मिळणार आहेत. ही रक्कम त्यांचे कपडे आणि इतर भत्त्यांसाठी असेल. भारतीय रुपयात ही रक्कम सुमारे ४२ लाख रुपये आहे. व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करताना नव्या राष्ट्राध्यक्षांना एक लाख डॉलर म्हणजेच जवळपास ८४ लाख रुपये मिळणार आहेत. ट्रम्प या पैशांचा वापर आपले निवासस्थान सजवण्यासाठी करू शकतात.
करमणूक भत्ता म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना दरवर्षी १९,००० हजार डॉलर म्हणजेच १६ लाख रुपये मिळणार आहेत. तसेच प्रवास भत्ता म्हणून दरवर्षी एक लाख डॉलरची रक्कम मिळणार आहे. सुमारे ८४ लाख रुपयांची ही रक्कम पूर्णपणे करपात्र राहणार असणार आहे.
एवढ्या पैशातून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत. यामध्ये एक लिमोझिन कार, मरीन हेलिकॉप्टर आणि प्रवासासाठी एअर फोर्स वन नावाच्या विमानाचा समावेश आहे. याशिवाय हेल्थकेअर, स्वयंपाकी, माळी, मोलकरीण आणि इतर कर्मचारीही उपलब्ध असतील.