US Presidential Election Results : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत आहे. आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांचा थेट सामना होणार होता. पण ऐनवेळी बायडेन यांच्या माघारीमुळे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. जनमत चाचणीत दोघांनाही समान मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकी कोण बाजी मारणार या कडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेत मंगळवारी मतदाणाला सुरुवात झाली आहे. नव्या अध्यक्ष निवडीसाठी काल मतदान पार पडले. सामान्यत: मतदान संपल्यानंतर लगेचच निवडणुकीचा निकाल कळतो. मात्र, यंदाची निवडणूक चुरशीची असल्याने अंतिम निकाल येण्यास आणखी थोडा वेळ लागणार आहे.
२०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता (स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजता) सुरू होईल. अंतिम मतदान बुधवारी स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १ वाजता संपेल.
जॉर्जियासह सहा राज्यांमध्ये संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३० वाजता पहिले मतदान संपणार आहे. अंतिम मतदान अलास्कामध्ये मध्यरात्री १२ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता संपणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता) मतदान संपणार आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल अनेकदा निवडणुकीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी स्पष्ट होत असतं. मात्र, यावेळी अनेक राज्यांमधील झालेल्या चुरशीच्या लढतीमुळे विजेत्याचा अंदाज जाहीर करण्यापूर्वी अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जवळपास समान मत मिळण्याची शक्यता असल्याने दोघांमध्ये काटे की टक्कर होणार असल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.
नजीकच्या निकालांमुळे काही राज्यांमध्ये मतमोजणीची गरज भासू शकते. उदाहरणार्थ, पेन्सिल्व्हेनिया हे एक महत्त्वाचं स्विंग देणारं राज्य आहे. येथे जर विजेता आणि उपविजेता यांच्यातील मतांचा फरक अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी राहिला तर मतांची पुन्हा मोजणी आवश्यक राहणार आहे. पेन्सिल्व्हेनियामध्ये २०२० च्या निवडणुकीत हा फरक १.१ टक्के होता.
मतदार पात्रता आणि मतदार यादी व्यवस्थापनाला आव्हान देणाऱ्यांसह १०० हून अधिक कायदेशीर कारवाई रिपब्लिकन पक्षाने यापूर्वीच केल्या आहेत. मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्याने निकालास उशीर होऊ शकतो.
वेगळी होती. २०२० मध्ये पेन्सिल्व्हेनियाचा निकाल लागताच जो बायडन यांना विजयी घोषित करण्यात आले होते. यापूर्वी २०१६ च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा मतदान संपल्यानंतर काही तासांतच करण्यात आली होती. बराक ओबामा यांच्या काळातही निकाल लवकर आले.
२००० ची निवडणूक याला अपवाद ठरली. जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यातील लढाई पाच आठवडे चालली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्लोरिडामधील मतमोजणी रद्द केली आणि जॉर्ज बुश यांचा विजय घोषित केला.