मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीत गोळीबार! थोडक्यात बचावले, राष्ट्रपतीपद निवडणुकीचा प्रचार करताना घडली घटना
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीत गोळीबार! थोडक्यात बचावले, राष्ट्रपतीपद निवडणुकीचा प्रचार करताना घडली घटना

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीत गोळीबार! थोडक्यात बचावले, राष्ट्रपतीपद निवडणुकीचा प्रचार करताना घडली घटना

Updated Jul 14, 2024 06:37 AM IST

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित प्रचारर रॅलीत असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाल्याचे वृत्त आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीत गोळीबार!थोडक्यात बचावले, राष्ट्रपतीपद निवडणुकीचा प्रचार करतांना घडली घटना
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीत गोळीबार!थोडक्यात बचावले, राष्ट्रपतीपद निवडणुकीचा प्रचार करतांना घडली घटना (AP)

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित रॅलीदरम्यान संबोधित करत असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले. यानंतर त्यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्याला स्टेजवरून बाहेर नेले. ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने सुरक्षा दलाने वेढलेल्या मंचावरून त्यांना बाहेर नेले जात असतांना त्यांच्या उजव्या कानाभोवती रक्त दिसत होते. डोनाल्ड ट्रम्प सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, माजी राष्ट्रपती सुरक्षित असल्याचे गुप्तहेर खात्याने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. गोळीबाराचा आवाज येताच त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुरक्षा एजन्सींचे आभार मानले. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहे. थोड्याच वेळात या बाबत आणखी माहिती दिली जाईल" असे प्रवक्ते स्टीव्हन चेउंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीत गोळीबार!थोडक्यात बचावले, राष्ट्रपतीपद निवडणुकीचा प्रचार करतांना घडली घटना
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीत गोळीबार!थोडक्यात बचावले, राष्ट्रपतीपद निवडणुकीचा प्रचार करतांना घडली घटना (AP)

पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे ट्रम्प एका रॅलीला संबोधित करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. यानंतर आरडाओरडा झाला.  सुरक्षा एजंटांनी त्यांना तातडीने मंचावरून बाजूना नेत सुरक्षित स्थळी हलवले. जेव्हा त्यांना मंचावरून खाली आणले जात होते, तेव्हा ट्रम्प यांनी गर्दीकडे तोंड करत त्यांच्या हाताची मुठ उंचावली. 

 

ट्रम्प सोमवारी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शन सुरू होण्यापूर्वी स्विंग-स्टेट पेनसिल्व्हेनियामध्ये त्यांच्या शेवटच्या रॅलीला संबोधित करत होते. उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. या घटनेनंतर लगेचच ट्विटरवरील एका पोस्टमध्ये हाऊस रिपब्लिकन लोकांनी अमेरिकन लोकांना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

या घटनेबाबत व्हाईट हाऊसने सांगितले की, राष्ट्रपती जो बिडेन यांना गुप्त सेवा संचालक किम्बर्ली चीटल, होमलँड सुरक्षा विभागाचे सचिव अलेजांद्रो मेयोर्कास आणि होमलँड सुरक्षा सल्लागार लिझ शेरवुड-रेंडल यांनी माहिती दिली आहे. या ब्रीफिंगमध्ये राष्ट्रपतींचे चीफ ऑफ स्टाफ आणि इतर सहाय्यकही सहभागी झाले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर