स्वच्छता कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत कचऱ्याच्या गाडीत बसले ट्रम्प, बायडेन आणि हॅरिसला म्हणाले लाज वाटू द्या; कारण काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  स्वच्छता कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत कचऱ्याच्या गाडीत बसले ट्रम्प, बायडेन आणि हॅरिसला म्हणाले लाज वाटू द्या; कारण काय?

स्वच्छता कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत कचऱ्याच्या गाडीत बसले ट्रम्प, बायडेन आणि हॅरिसला म्हणाले लाज वाटू द्या; कारण काय?

Updated Oct 31, 2024 11:22 PM IST

Donald Trump : सफाई कर्मचाऱ्याचा वेश परिधान करून कचऱ्याच्या गाडीत बसून ट्रम्प म्हणाले की, कमला हॅरिस आणि बायडेन यांच्या त्या विधानाला माझा विरोध आहे आणि मी त्यांना सांगू इच्छितो की अमेरिकेतील २५ कोटी लोक कचरा नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प (AP)

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रचार रॅलीदरम्यान कचऱ्याच्या ट्रकमध्ये बसलेले दिसले. यावेळी ट्रम्प यांनी कचरा वेचकांचा ड्रेस परिधान केला होता. खरे तर ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या वक्तव्याला उत्तर देत होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, ट्रम्प यांचे सर्व समर्थक कचरा आहेत. ट्रम्प यांनी या विधानाचा वापर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांच्याविरोधात करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्रकमध्ये बसलेल्या पत्रकारांना विचारले, "मला सांगा, तुम्हाला माझा कचऱ्याचा ट्रक कसा वाटतो?" माझा हा ट्रक कमला हॅरिस आणि बायडन यांच्या सन्मानार्थ आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कचऱ्याचा वाद गेल्या आठवड्यात सुरू झाला होता. ट्रम्प यांच्या २७ ऑक्टोबरच्या प्यूर्टो रिको रॅलीत प्रवक्त्याने (हिंचक्लिफ) प्युर्टो रिकोला तरंगते कचरा बेट म्हटले होते, तेव्हा सुरुवातीला रिपब्लिकन उमेदवारासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु नंतर बायडन यांनी आपल्या वक्तव्याने ट्रम्प यांना आघाडी मिळवून दिली. खरं तर ट्रम्प यांच्या सभेत बोलल्या गेलेल्या या वक्तव्याला उत्तर देताना बायडेन म्हणाले की, मला अमेरिकेत दिसणारा एकमेव कचरा म्हणजे त्यांचे समर्थक. राष्ट्राध्यक्षांच्या विधानावर नंतर व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण देत म्हटले की, बायडेन ट्रम्प यांच्या रॅलीतील भाषणांना कचरा म्हणत आहेत. 

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या या वक्तव्याकडे रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्प समर्थकांवरील हल्ला म्हणून पाहिले होते. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेने हिंचक्लिफ यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर ठेवले, परंतु बायडेन यांच्या वक्तव्याचा जोरदार फायदा घेत त्यांच्यावर टीका केली. ट्रम्प यांनी विस्कॉन्सिनच्या रॅलीत प्रचारादरम्यान कचऱ्याच्या ट्रकवर चढून 'बायडेन यांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे', अशी ओरड केली होती.

बायडेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की,  मी आज ट्रम्प यांच्या रॅलीमध्ये प्यूर्टो रिकोबद्दल केलेल्या घृणास्पद वक्तव्याला उत्तर दिले. त्या विधानाला कचरा म्हणणे अगदी योग्य आहे. पण रिपब्लिकनांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला, तो चुकीचा आहे.

या वक्तव्यानंतर ट्रम्प कचरा वेचकाचा ड्रेस परिधान करून विल्कॉन्सिनमधील रॅलीत पोहोचले. ट्रम्प यांनी या रॅलीत हा ड्रेस परिधान करून सुमारे ९० मिनिटे भाषण केले आणि आपला सिग्नेचर डान्सही केला. अमेरिकेतील २५ कोटी लोक कचरा नाहीत, असे ट्रम्प म्हणाले. कमला हॅरिस आणि बायडन यांच्या त्या विधानाला माझा विरोध असून अमेरिकेतील २५ कोटी जनता कचरा नाही, हे त्यांनी सांगावे, अशी माझी इच्छा आहे, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. डेमोक्रॅटिक पक्षातून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उपराष्ट्रपती कमला हॅरिस मैदानात आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर