Explainer: शिवीगाळ केल्यानंतर माणसाचा राग होतो कमी? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Explainer: शिवीगाळ केल्यानंतर माणसाचा राग होतो कमी? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Explainer: शिवीगाळ केल्यानंतर माणसाचा राग होतो कमी? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Jan 07, 2025 08:04 PM IST

Do you Know: खरेच शिवीगाळ केल्याने एखादा व्यक्ती तणावमुक्त होतो का? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवीगाळ केल्यानंतर माणसाचा राग होतो कमी? वाचा
शिवीगाळ केल्यानंतर माणसाचा राग होतो कमी? वाचा

General knowledge: साधारणपणे शिव्या देणे हे अज्ञानाचे लक्षण मानले जाते. सुसंस्कृत समाजात शिव्या देणाऱ्या व्यक्तीला निरक्षर, बेशिस्त आणि असंस्कृत म्हटले जाते. तथापि, अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, जे लोक गैरवर्तन करत नाहीत, त्यांच्या तुलनेत असे लोक अधिक आनंदी आणि तणावमुक्त राहतात. शिवीगाळ करणाऱ्यांची समस्यांशी लढण्याची क्षमता जास्त असते. म्हणूनच अनेक देशांमध्ये जिम किंवा योगा क्लासेस दरम्यान लोकांना त्यांचा राग काढण्यास सांगितले जाते. अनेकदा लोक जिममध्ये व्यायामासोबतच शिवीगाळही करतात.

वाढत्या तंत्रज्ञानासह मानवी आयुष्यालाही वेग आला. धावपळीच्या जगात माणसाचे आयुष्य घड्याळ्याच्या काट्यावर धावत आहे. सकाळी उठले की, अनेकांना ऑफिसमध्ये पोहोचण्याची घाई असते.ऑफिसला पोहोचल्यानंतर भरमसाठ काम केल्यानंतर घरी परतताना ट्रॅफिक जॅम पाहून तणाव वाढतो. त्यामुळे चिडचिड होते. त्यानंतर अनेकांच्या वागणुकीत बदल पाहायला मिळतो. समोरच्या व्यक्तीला वाईट वाटत असले तरी अनेकजण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता शिवीगाळ करतात.

एखाद्याला शिवीगाळ करणे किंवा काहीही कारण नसताना त्यांच्यावर रागावणे ही चांगली गोष्ट नाही. आपण अनेकदा पाहिले असेल की, काही लोक एकमेकांना शिव्या देतात. खरे तर हे लोक आपल्या डोक्यावरील ताण कमी करत असतात. न्यू जर्सी येथील कीन युनिव्हर्सिटीमध्ये यावर संशोधन करण्यात आले. यानुसार, गैरवर्तनामुळे समस्यांशी लढण्याची आपली क्षमता वाढते. एकमेकांना शिवीगाळ करणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने संशोधन केले. संशोधकांनी अशा विद्यार्थ्यांचे हात अतिशय थंड पाण्यात टाकले. त्यानंतर शांत झालेल्या विद्यार्थ्यांनी काही वेळातच पाण्यातून हात बाहेर काढले.

तुम्हाला हे माहिती आहे का?

राग ही भावना एखाद्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिकरित्या प्रभावित करू शकते. फक्त २ मिनिटांचा राग तुमच्या शरीराला अनेक तासांपर्यंत हानी पोहोचवू शकतो. तज्ज्ञांचे मते, रागावल्यानंतर शरीरात ‘कॉर्टिसोल’ नावाच्या हार्मोनची पातळी झपाट्याने वाढते. रागामुळे तुमच्या शरीरातील कोर्टिसोलची पातळी पुढील ७ तासांपर्यंत जास्त प्रमाणात राहते. याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. याशिवाय, शारीरिक स्वास्थ्यही कमकुवत होते, ज्यामुळे चिंता आणि अस्वस्थता वाढते.कोर्टिसोल हा एक तणाव संप्रेरक आहे, ज्यामुळे शरीरातील विविध प्रक्रियांवर परिणाम देखील होतो. जसे की, चयापचय, रक्तदाब यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते. राग आल्यावर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याचा अर्थ तुमचे शरीर संक्रमण आणि रोगांशी लढण्यात कमकुवत होते. यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला सारख्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर