चीनमधील डॉक्टरांची कमाल; डुक्कराच्या यकृताचे मानवामध्ये यशस्वी प्रत्यारोपण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चीनमधील डॉक्टरांची कमाल; डुक्कराच्या यकृताचे मानवामध्ये यशस्वी प्रत्यारोपण

चीनमधील डॉक्टरांची कमाल; डुक्कराच्या यकृताचे मानवामध्ये यशस्वी प्रत्यारोपण

Published Mar 27, 2025 12:49 PM IST

चीनमधील डॉक्टरांनी एक अनोखा पराक्रम केला आहे. येथे डॉक्टरांनी जनुकीय सुधारित डुक्कराचे यकृत ब्रेन डेड व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित केले. हे यकृत दहा दिवस पूर्णपणे कार्य करत राहिले.

डुक्कराचे यकृत माणसामध्ये प्रत्यारोपित
डुक्कराचे यकृत माणसामध्ये प्रत्यारोपित

चीनमधील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. रिपोर्टनुसार, या डॉक्टरांनी जेनेटिकली मॉडिफाइड डुक्कराचे यकृत ब्रेन डेड व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित केले. या प्रक्रियेनंतर, हे यकृत सुमारे १० दिवस त्या व्यक्तीच्या शरीरात योग्यरित्या कार्य करत राहिले. डुक्करापासून माणसापर्यंत केलेली ही शस्त्रक्रिया अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया मानली जाते. असे प्रत्यारोपण यशस्वी झाल्यास मानवी इतिहासातील मोठी क्रांती ठरेल.

चीनमधील शियान येथील झिजिंग हॉस्पिटलमधील शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे डॉक्टर लिन वांग यांनी सांगितले की, डुक्कराचे यकृत मानवी शरीरात चांगले कार्य करू शकते की नाही आणि भविष्यात ते मूळ मानवी यकृताची जागा घेऊ शकते की नाही याचा आम्ही प्रथमच शोध घेतला आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून आम्ही मिळवलेले यश आमच्यासाठी स्वप्नासारखे आहे.

चीनमध्ये २०२२ पासून डुकराचे अवयव मानवांमध्ये प्रत्यारोपित करण्याचे काम सुरू आहे. यकृत प्रत्यारोपणाची ही घटना एका मोठ्या मालिकेचा भाग आहे. अमेरिकेतही अशीच प्रक्रिया सुरू आहे. अमेरिका आणि चीनमधील काही रुग्णांवर डुकराचे हृदय, मूत्रपिंड आणि थायमस ग्रंथी प्रत्यारोपण करण्यात आले होते. मात्र, या प्रक्रियेनंतर काही वेळातच अनेकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कारण हे प्रत्यारोपण अशा लोकांमध्ये करण्यात आले होते जे गंभीर आजाराने ग्रस्त होते. प्रत्यारोपणानंतर अनेक जण बाहेर आले जे पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी गेले.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर