मुरादाबाद जिल्ह्यातील ठाकूरद्वारा- काशीपूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरने २० वर्षीय नर्सवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडकीस आली. बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून ठाकूरद्वारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी राजपूर केसरिया येथील रहिवासी डॉ. शाहनवाज, दुसरी नर्स मेहनाज आणि वॉर्ड बॉय झुनैद यांना अटक केली आहे.
भारतीय न्याय संहिता कलम ६१ (२), ६४ आणि ३५१ (२) आणि एससी/एसटी कायद्याच्या कलम १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरादाबादचे एसपी (ग्रामीण) संदीप कुमार मीणा यांनी अटकेला दुजोरा देताना सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे आणि रुग्णालय सील करण्यात आले आहे.
ठाकूरद्वारा भागाचे सर्कल ऑफिसर राजेश कुमार यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडली आणि आरोपी डॉक्टरने नर्सचा मोबाईल फोनही आपल्याकडे ठेवला. तिने वॉर्ड बॉय झुनैदला घडलेला प्रकार सांगितला आणि नर्स मेहनाजलाही या घटनेची माहिती होती, पण त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली नाही.
बलात्कार पीडितेने आपल्या कुटुंबीयांना आपबीती सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी ठाकूरद्वारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. ही २० वर्षीय तरुणी गेल्या १० महिन्यांपासून खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्या ड्युटीसाठी रुग्णालयात गेली होती.
आरोप आहे की, षडयंत्राचा भाग म्हणून रुग्णालयात तैनात असलेल्या एका नर्सने तिला सांगितले की, डॉ. शाहनवाज यांनी तिला आपल्या केबिनमध्ये बोलावले होते. तिने डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिल्याने वॉर्डबॉय जुनैद व मेहनाज यांनी तिला बळजबरीने डॉ. शाहनवाज यांच्या खोलीत नेले आणि नंतर बाहेरून कुलूप लावले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर डॉ. शाहनवाज यांनी खोलीत घुसून तिच्यावर अत्याचार केला.
डॉक्टरांनी तिचा मोबाईलही आपल्या ताब्यात घेतला. रविवारी सकाळी मुख्य परिचारिका आली असता बलात्कार पीडितेने तिच्याकडे तक्रार केली आणि तिला घरी पाठविण्यात आले.
कोलकात्यातील आर. जी. कर रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. शवविच्छेदनात लैंगिक अत्याचाराचे पुरावेही सापडले. कोलकात्यातील आर. जी. कर रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. शवविच्छेदनात लैंगिक अत्याचाराचे पुरावेही सापडले. पीडितेच्या शरीरावर गाल, ओठ, नाक, मान, हात आणि गुडघ्यावर १६ बाह्य जखमा असल्याचे अहवालात म्हटले आहे. नऊ अंतर्गत जखमाही आढळून आल्या. तिच्या प्रायव्हेट पार्टलाही जखमा झाल्याचं समोर आलं असून सर्व जखमा मृत्यूपूर्वी करण्यात आल्या होत्या.