हॉस्पिटलच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले अश्लिल व्हिडिओ, डॉक्टरचा असा झाला पर्दाफाश-doctor installed hidden camera in ladies toilet of hospital rajasthan sikar news ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हॉस्पिटलच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले अश्लिल व्हिडिओ, डॉक्टरचा असा झाला पर्दाफाश

हॉस्पिटलच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले अश्लिल व्हिडिओ, डॉक्टरचा असा झाला पर्दाफाश

Sep 14, 2024 01:04 PM IST

Rajasthan Crime : राजस्थानमधील सीकर येथील फिजिओथेरपी सेंटरच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे.

हॉस्पिटलच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले अश्लिल व्हिडिओ, डॉक्टरचा असा झाला पर्दाफाश
हॉस्पिटलच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले अश्लिल व्हिडिओ, डॉक्टरचा असा झाला पर्दाफाश

Rajasthan Crime : राजस्थानमधील सीकर येथील फिजिओथेरपी सेंटरच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी फिजिओथेरपी सेंटरवर छापा टाकला असता त्यांना टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावलेला आढळला. या सोबतच डॉक्टरांच्या केबिनमध्ये एका बॅगेत अश्लील व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह देखील सापडला आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड येथील कै. नंदलाल लखोटिया हेल्थ अँड मेडिकल सेंटर आणि फिजिओथेरपी सेंटरवर ही कारवाई करण्यात आली आहे. या सेंटरच्या प्रसाधनगृहात छुपे कॅमेरे लावून महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले जात होते. शुक्रवारी संध्याकाळी, पोलिसांनी या केंद्रावर छापा टाकला, ज्यामध्ये शौचालय आणि डॉक्टरांच्या बॅगमधून अश्लील व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह व छुपे कॅमेरे जप्त करण्यात आले.

डीएसपी दिलीप मीणा यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रात छुप्या कॅमेऱ्यांबाबत तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांच्या पथकाने केंद्राच्या स्वच्छतागृहाची तपासणी केली असता तेथे त्यांना छुपा कॅमेरा बसवण्यात आल्याचे आढळले. याशिवाय डॉक्टरांच्या केबिनमध्ये ठेवलेल्या बॅगेतून आणखी एक छुपा कॅमेरा व चार पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आहेत. या पेन ड्राईव्हमध्ये अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते.

या प्रकरणी फिजिओथेरपी सेंटरचे संचालक डॉ. सुरेश जांगीड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान हे डॉक्टर रोज सकाळी केंद्रावर पोहोचून टॉयलेटमधील कॅमेरा बदलून आधीच्या कॅमेऱ्यातील व्हिडिओ घरी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. केंद्रात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यांचा संशय आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. या सेंटरमध्ये काहीतरी गडबड असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर केंद्राची व्हिडिओग्राफी आणि तपासणी करण्यात आली, त्यातून ही बाब समोर आली. पोलीस आता संपूर्ण केंद्राची कसून चौकशी करत असून या घटनेत सहभागी असलेल्या इतर लोकांचीही चौकशी केली जात आहे.

Whats_app_banner
विभाग