दोन बायका अन् फजिती ऐका..! डॉक्टर नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी, दोघींकडे ३-३ दिवस राहणार अन् १ दिवस..
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोन बायका अन् फजिती ऐका..! डॉक्टर नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी, दोघींकडे ३-३ दिवस राहणार अन् १ दिवस..

दोन बायका अन् फजिती ऐका..! डॉक्टर नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी, दोघींकडे ३-३ दिवस राहणार अन् १ दिवस..

Jan 27, 2025 08:49 PM IST

यूपीच्या बागपतमध्ये पती-पत्नीच्या वादाचे एक अजब प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर इथे एक पुरुष होता ज्याच्या दोन बायका होत्या. दोन्ही बायकांनी पोलिस स्टेशनमध्ये पतीसोबत समान-समान राहण्यासाठी दिवस वाटून घेतले.

डॉक्टर नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी
डॉक्टर नवऱ्याची दोन पत्नींमध्ये वाटणी

कुटुंबातील जमीन आणि मालमत्तेच्या विभागणीबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल, पण आम्ही तुम्हाला ज्या वाटणीबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. डॉक्टर नवऱ्याची ही विभागणी आहे, जी दोन बायकांमध्ये करण्यात आली आहे. झालेल्या वाटणीनुसार पती आठवड्यातून तीन दिवस एका पत्नीसोबत आणि दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहणार आहे. विशेष म्हणजे रविवारी डॉक्टर आपल्या आईसोबत वेळ घालवणार आहेत. या अजब निर्णयावर सोमवारी बागपत कोतवालीत शिक्कामोर्तब झाले.

सोमवारी सकाळी बागपत शहरातील एका डॉक्टरची दुसरी पत्नी कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पोलिसांना सांगितले की, ती सात महिन्यांची गरोदर आहे. पती तिची काळजी घेत नाही आणि पहिल्या पत्नीसोबत राहतो. त्यानंतर पोलिसांनी तरुण आणि त्याच्या पहिल्या पत्नीला कोतवालीत बोलावले. त्यानंतर तरुणाच्या दोन पत्नींमध्ये तासनतास वाद झाला. पोलिसांनी कडक भूमिका घेत तरुणाला लॉकअपमध्ये ठेवण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही महिलांनी परस्पर सहमती दर्शवली. यानंतर तक्रारदार पत्नीने पोलिसांना पत्र लिहून आम्ही दोघीही स्वेच्छेने प्रत्येकी तीन दिवस पतीसोबत राहणार असल्याचे सांगितले. पहिली पत्नी सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पतीसोबत असेल. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी दुसरी पत्नी पतीसोबत राहणार आहे.

या निवाड्यानुसार रविवारी डॉक्टर आपल्या वृद्ध आईसोबत असतील. या दरम्यान ते आमच्यापैकी कोणाकडेही जाणार नाहीत किंवा फोनवर बोलणार नाहीत. इतकंच नाही तर आमच्यापैकी कोणीही एकमेकांच्या मुलांसोबतचे पतीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही, असंही करारनाम्यात लिहिलं होतं. परस्पर सामंजस्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना कोतवाली येथून घरी पाठवले. दरम्यान, पती विभाजनाचा हा विषय शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

पहिल्या पत्नीपासून सात मुले आणि दुसऱ्या पत्नीपासून एक मूल -

सांगितले जात आहे की, तरुण व्यवसायाने डॉक्टर असून ते शहरात त्यांच्या घरी राहतात. सुमारे १५ वर्षांपूर्वी या तरुणाचा बागपत कोतवाली परिसरातील एका गावातील मुलीशी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांना पहिल्या पत्नीपासून सात मुलांचा जन्म झाला. दरम्यान, या तरुणाचे शहरात राहणाऱ्या घटस्फोटित महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने लग्न केले. लग्नानंतर दुसऱ्या पत्नीने मुलीला जन्म दिला. त्याने सांगितले की,  दुसरी पत्नी आता सात महिन्यांची गरोदर आहे.

बागपत कोतवालीचे प्रभारी डी. के. त्यागी म्हणाले, 'तरुणाने दोन विवाह केले आहेत. दुसऱ्या पत्नीने पती आपली काळजी घेत नसल्याचा आरोप करत तक्रार पत्र दिले होते. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण मिटवण्यासाठी तरुण आणि त्याच्या पहिल्या पत्नीला कोतवालीत बोलावले. त्यानंतर दोन्ही महिलांनी पतीसोबत तीन दिवस राहण्याची इच्छा व्यक्त करत करार केला आहे. आता आठवड्याचे पहिले तीन दिवस नवरा पहिल्या पत्नीसोबत आणि नंतर पुढचे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहणार आहे. रविवारी पती वृद्ध आईसोबत असणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर