यूपी सरकार व पोलीस कारवाईनंतरही धर्मांतरणाचे प्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत. पश्चिम यूपीमधूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. ही घटना सहारनपूरमधील आहे. पोलिसात गेलेल्या महिनेने आरोप केला की, एका डॉक्टरने धर्म लपवून तिच्याशी प्रेमसंबंध बनवले, त्यानंतर तिच्याशी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाह केला. त्यानंतर तिचे व तिच्या सात वर्षीय मुलीचे धर्मांतरण करून पुन्हा आरोपी डॉक्टरने निकाह केला. महिलेने आरोप केला की, आरोपी डॉक्टरच्या आधीच चार पत्नी आहेत.
महिलेने सांगितले की, लग्नानंतर आरोपी तिला आपल्या घरी घेऊन आला व सीसीटीव्ही लावलेल्या बेडरूममध्ये पाठवले. त्यानंतर डॉक्टरने आपल्या मित्रांना बोलावले. डॉक्टरचे मित्र महिलेवर सामूहिक बलात्कार करत होते तर बाहेर डॉक्टर सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे पाहत होता. महिलेने डॉक्टरवर मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. तिने पोलिसांवर आरोप केला की, पोलिसांकडे मदत मागितली मात्र त्यांनी कोणतीही मदत केली नाही.
कोलकाता येथील बालीगुंज निवासी महिलेने तक्रारीत म्हटले की, ती गंगोह येथील मोहल्ला कोटला निवासी डॉ. अहबार हुसेन यांच्यासोबत १२ मे २०२२ पासून लिव इन रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर दोघांनी हिंदू-रीति रिवाजानुसार विवाह केला. तिने आरोप केला की, डॉ. हुसेन यांनी तिचे व तिच्या सात वर्षीय मुलीचे जबरदस्तीने धर्मांतरण केले. त्यानंतर तिच्याशी निकाह केला. निकाल केल्यानंतर आरोपीने आपले मित्र डॉ. शहजाद आणि डा. आरिफ यांना बोलावले. त्यांनी २१ जून २०२३ रोजी सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर आरोपी तिला कोलकात्यात सोडून आला होता. याबाबत महिलेने देवबंद कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
पीडित महिलेने सांगितले की, हिंदू संघटनांच्या माध्यमातून मीडियाला आपबिती सांगितली. त्यानंतर महिला पोलीस अधीक्षक सागर जैन यांना जाऊन भेटली. तिने आरोपी डॉक्टविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टराच्या अटकेची कारवाई केली जाईल. दरम्यान डॉक्टरच्या सरसावा निवासी पहिल्या पत्नीने सांगितले की, ती गेल्या चार वर्षापासून पतीपासून विभक्त आपल्या माहेरी रहात आहे.
संबंधित बातम्या