अक्षम्य हलगर्जीपणा.. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली अन् सुई तरुणीच्या डोक्यातच विसरले, पुढं काय घडलं?-doctor forgets surgical needle inside young girl head in up ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अक्षम्य हलगर्जीपणा.. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली अन् सुई तरुणीच्या डोक्यातच विसरले, पुढं काय घडलं?

अक्षम्य हलगर्जीपणा.. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली अन् सुई तरुणीच्या डोक्यातच विसरले, पुढं काय घडलं?

Sep 30, 2024 07:19 PM IST

एका सरकारी रुग्णालयातीलडॉक्टरने१८वर्षीय महिलेच्याडोक्यातसर्जिकल सुईविसरली. तिच्यावर टाके घालण्यात आले होते.

डॉक्टर सुई तरुणीच्या डोक्यातच विसरले (संग्रहित छायाचित्र)
डॉक्टर सुई तरुणीच्या डोक्यातच विसरले (संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेश राज्यातील हापुड़मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने १८ वर्षीय महिलेच्या डोक्यात सर्जिकल सुई विसरली. तिच्यावर टाके घालण्यात आले होते. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात महिलेच्या डोक्याला दुखापत झाली होती.  डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की, डोक्यावर टाके घालायला लागतील. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर काही वेळातच तिच्या डोक्यातून असह्य वेदना होऊ लागल्या. वेदनेने ती ओरडू लागली. 

त्यानंतर तिला कुटूंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जखम पुन्हा उघडून आत पाहिले असता त्यांना धक्का बसला. आतमधील सुई काढल्यानंतर तिला थोडा आराम मिळाला. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. १८ वर्षीय तरुणीच्या डोक्याला टाके लावण्यात आल्यानंतर सुई तिच्या डोक्यात राहिल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. 

सितारा असं तरुणीचं नाव आहे. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर सितारा जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंत तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी यावेळी तिच्या डोक्याला टाके लावले. डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. तिच्या डोक्याला टाके लावून आणि पट्टी लावून घरी पाठवलं. मात्र सुई तिच्या डोक्यातच राहिली.

तरुणीच्या आईने सांगितले की, आमच्यासारखी परिस्थिती कोणावरही ओढावू नये. या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी. हापुड जिल्हा मुख्य शल्यचिकित्सक डॉ. सुनील त्यागी यांनी सांगिचले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्यात ली आहे. या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाईल. दरम्यान तरुणीच्या नातेवाईकांनी आरोप केला की, शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर दारूच्या नशेत होता. तरुणीच्या आईने डॉक्टरांनी डोक्यातून काढलेली सुईदेखील दाखवली आहे. 

Whats_app_banner