Google वर चुकूनही या गोष्टी कधी करू नका सर्च, अन्यथा खावी लागेल जेलची हवा!-do not searching these things on google search pirated movies criminal activities abortion and more ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google वर चुकूनही या गोष्टी कधी करू नका सर्च, अन्यथा खावी लागेल जेलची हवा!

Google वर चुकूनही या गोष्टी कधी करू नका सर्च, अन्यथा खावी लागेल जेलची हवा!

Sep 11, 2024 11:20 PM IST

google search : गुगल सर्चवर तुमची छोट्यातील छोटी चूकही तुम्हाला मोठ्या संकटात घालू शकते व तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. तर जाणून घेऊया.. गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च करण्यापासून लांब राहिले पाहिजे.

Google वर चुकूनही या गोष्टी कधी करू नका सर्च
Google वर चुकूनही या गोष्टी कधी करू नका सर्च

सध्याचा जमाना माहिती व तंत्रज्ञानाचा आहे. आधुनिकतेच्या या काळात जगातील कोणत्याही गोष्टीचे ज्ञान व कशाबद्दलचीही माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. गुगल जगभरात सर्वात अधिक वापरण्यात येणारे सर्च इंजिन आहे. गुगल सर्च करताना या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की, आपल्याला काय सर्च करावे व काय सर्च करू नये. गुगल सर्चवर तुमची छोट्यातील छोटी चूकही तुम्हाला मोठ्या संकटात घालू शकते व तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. तर जाणून घेऊया.. गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च करण्यापासून लांब राहिले पाहिजे.

पायरेटेड फिल्म –

अनेक लोक फ्री फिल्म किंवा वेब सीरीज पाहण्यासाठी ती गुगलवर सर्च करतात मात्र जर तुम्ही नवीन चित्रपट पायरेट करण्याचे काम करत असाल किंवा हे गुगल सर्च करत असाल तर हा गुन्हा आहे. या प्रकरणात तुम्हाला कमीत कमी तीन वर्षापर्यंतचा तुरुंगवास सोसावा लागू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतच दंडही ठोठावला जाऊ शकतो.

चाइल्ड पॉर्न किंवा चाइल्ड क्राइमबाबत सर्च करू नका -

गुगल चाइल्ड पॉर्न म्हणजे लहान मुलांशी संबंधित अश्लील कंटेंटला प्रोत्साहन देत नाही. जर तुम्ही याबाबतची माहिती गुगलवर सर्च करत असाल तर हे गुम्ह्याच्या श्रेणीमध्ये येते. भारतात याबाबत कडक कायदा अस्तित्वात आहे. यामध्ये पोक्सो कायदा २०१२ च्या कलम १४ अंतर्गत चाइल्ड पॉर्न पाहणे, बनवणे तसेच आपल्या डिव्हाइसमध्ये सेव करून ठेवणे गुन्हा मानले जाते. या प्रकरणात अडकल्यास तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. या गुन्ह्यात ५ ते ७ वर्षापर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागतो. 

बॉम्ब तसेच अन्य शस्त्रे बनवण्याची पद्धत -

गुगलवर बॉम्ब तसेच अन्य स्फोटक सामुग्री तसेच शस्त्रे बनवण्याची पद्धत शोधण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यास तुम्ही सर्वात आधी देशाच्या सुरक्षा एजन्सीजच्या रडारवर याल. तुम्ही चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकता. इतकेच नाही तर प्रेशर कुकर बॉम्ब बनवण्याची पद्धतही गुगल सर्च करणे गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते.

गर्भपाताबाबतची माहिती सर्च करू नका - 

गुगलवर कधीही गर्भपाताबाबत सर्च करू नये. कारण भारतात डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. जर तुम्ही याबाबत गूगल सर्च करत असाल तर तुम्ही पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकता. त्याचबरोबर हे सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे हे गुगलवर सर्च करू नये.

या गोष्टीही गुगलवर सर्च करण्यापासून परावृत्त व्हावे - 

गुगलवर कोणत्याही गुन्हेगारी कृत्यांबाबत सर्च करू नये. दहशतवादी संघटनांची माहिती, दहशतवादी कृत्य, त्याचबरोबर बलात्कार पीडितेचे नाव सर्च करण्यापासून दूर रहा.

Whats_app_banner