मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

Fact Crescendo HT Marathi
May 18, 2024 01:25 PM IST

Tamilnadu News : व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, दावा केला जात आहे की,तामिळनाडुमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळत असताना आगीचा भडका उडतो व त्यांच्याच लुंगीला आग लागली.

मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य
मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूतील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक एक पुतळा जाळताना दिसत आहेत. पुतळा दहन करण्यापूर्वी आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत येतात व एका चौकात पुतळा जाळतात. मात्र हे करताना त्यांच्याच लुंगीला आग लागते. दावा केला जात आहे की,तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळत असताना आगीचा भडका उडतो व त्यांच्याच लुंगीला आग लागली.

ट्रेंडिंग न्यूज

व्हिडिओच्या पडताळणीअंती समजले की, व्हायरल व्हिडिओ पंतप्रधान मोदींशी संबंधित नाही. १२ वर्षांपूर्वी केरळमधील कोची शहरातील एमजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात केरळ विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचे दहन केले होते.

काय आहे दावा?

पुतळा जाळतानाचा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, तामिळनाडूमध्ये मोदीजींच्या पुतळ्याचे दहन करताना ५ DMK नेत्यांच्या लुंगीला आग लागली.

 

व्हिडिओची तथ्य पडताळणी -

याबाबत रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर कळाले की, व्हायरल व्हिडिओ २०१२ पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. एशियानेट न्यूजने ५ जुलै २०१२ रोजी युट्यूबवर हाच व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओसोबत महिती दिली आहे की, एमजी विद्यापीठाच्या कुलगुरू विरोधात ‘केरळ विद्यार्थी संघा’चे (केएसयू) कार्यकर्ते आंदोलन करत होते. त्यावेळी कुलगुरूंच्या पुतळ्याचे दहन करताना काही कार्यकर्त्यांच्या लुंगीला आग लागली होती.

 

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की,व्हिडिओमध्ये दिसणारा झेंडा आणि केएसयू संघाचा झेंडा एकच आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारा झेंडा आणि केएसयू संघाच्या झेंडा एकच आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारा झेंडा आणि केएसयू संघाच्या झेंडा एकच आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने २४ जुलै २०१२ रोजी बातमी प्रकाशित केली आहे. या प्रकाशित केलेल्या बातमीनुसार व्हिडिओमध्ये दिसणारे विद्यार्थी केरळमधील कोची शहरातील एमजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करत होते. कुलगुरूंचा पुतळा जाळताना जखमी झालेल्या आंदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक माहिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ पंतप्रधान मोदींशी संबंधत नाही. आंदोलक मोदींचा पुतळा दहन करत नव्हते. तर १२ वर्षांपूर्वी केरळमधील कोची शहरातील एमजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात केरळ विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचे दहन केले होते. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Fact Crescendo ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

टी-२० वर्ल्डकप २०२४