मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  A Raja Controversy : आम्ही रामाचे शत्रू, भारत एक देश नाही; DMK नेते ए राजा बरळले, हनुमानाची केली माकडाशी तुलना

A Raja Controversy : आम्ही रामाचे शत्रू, भारत एक देश नाही; DMK नेते ए राजा बरळले, हनुमानाची केली माकडाशी तुलना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 05, 2024 05:30 PM IST

DMK MP A Raja Sparks Controversy :डीएमके खासदार ए राजा यांनी म्हटले की, भारत कधीही एक देश नव्हता. एका देशाचा अर्थएक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती आहे. तेव्हाच त्याला एका राष्ट्राचा दर्जा दिला जातो.

डीएमके नेते ए राजा यांचे प्रभू राम व हनुमानाबाबत वादग्रस्त वक्तव्य
डीएमके नेते ए राजा यांचे प्रभू राम व हनुमानाबाबत वादग्रस्त वक्तव्य

DMK MP A Raja Sparks Controversy : तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके पक्षाचे खासदार ए राजा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी भारताला देश मानण्यास नकार दिला आहे.  ए. राजा यांनी म्हटले की, भारत कधीही देश नव्हता. एका देशाचा अर्थ आहे - एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती आहे. तेव्हाच त्याला राष्ट्राचा दर्जा दिला जातो. ए राजा यांनी हे विधान ३ मार्च रोजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त कोईमतूर येथे आयोजित एक सभेत केले.

ए राज यांची ४ विधाने ज्याच्यावर सुरू आहे वाद -

1 - भारत एक देश नाही, तर उपखंड आहे -
ए राजा यांनी म्हटले की, भारत एक राष्ट्र नाही, तर एक उपखंड आहे. कारण येथे अनेक परंपरा आणि संस्कृती आहेत. जर तुम्ही तामिळनाडूत आलात तर येथे एक संस्कृती, केरळमध्ये वेगळी संस्कृती आणि दिल्लीमध्ये वेगळी संस्कृती आहे. जसे तामिळनाडूत एक भाषा एक संस्कृती आहे. हा एक देश है. मळयालम एक भाषा,एक राष्ट्र आणि एक देश आहे. उडिया एक भाषा आणि ओडिशा एक देश आहे. या सर्वांपासून भारत बनतो. यामुळे भारत देश नाही तर अनेक देशांचा उपखंड आहे.

2-मणिपूरमध्ये खाल्ले जात कुत्र्याचे मांस -
ए राजा यांनी म्हटले की, मणिपूरमध्ये कुत्र्याचे मांस खाल्ले जाते. ही एक संस्कृती आहे. यामध्ये काहीही चुकीचे नाही. मणिपूरमध्ये लोक कुत्र्याचे मांस खातात व ते कबूलही करतात. अशाप्रकारे काश्मीरची वेगळी संसकृती आहे. जर एकादा समूह गोमांस खात असेल तर तुम्हाला काय त्रास आहे? त्यांनी तुम्हाला खायला सांगितले का? ही तर विविधतेत एकता आहे. आपल्यात मतभेद आहेत, हे स्वीकार करा.

3- पाण्याची टाकी एकच मात्र वापर वेगवेगळा –

डीएमके खासदाराने म्हटले की, पाण्याच्या टाकीतून पाणी स्वंयपाक घरात येते.  त्या पाण्याचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जाईल. पाण्याच्या टाकीतील तेच पाणी शौचालयात येते. मात्र ते पाणी आपण अन्य कामासाठी वापरणार नाही. याचे कारण काय? मानसशास्त्रानुसार आपल्याला समस्या होत आहेत. पाणी एकच आहे मात्र कुटून येते ते अंतर महत्वाचे आहे. आपण दोन्ही स्वीकार करतो की, ते शौचालय आहे व हे स्वंयपाक घर आहे.

4 - तामिळनाडू कधीच राम व भारताला स्वीकार करणार नाही –

डीएमके नेते ए. राजा यांनी म्हटले की, भाजपची विचारधारा स्वीकार करू शकत नाही. जर तुम्ही म्हणत असाल की, हे देव आहेत. हे जय श्री राम आहेत, भारत माता की जय, तर आम्ही आणि तामिळनाडू कधीही भारत माता आणि जय श्रीराम स्वीकार करू शकणार नाही. सांगा त्यांना आम्ही सर्व रामाचे शत्रु आहोत. मला रामायण आणि प्रभू रामावर विश्वास नाही. ए राजायांनी हनुमानाची तुलना माकडाशी करत 'जय श्री राम' घोषणेला घृणास्पद म्हटले. मी रामायणात विश्वास ठेवत नाही. रामायणात ४ भावांनी कुरावर, वेतुवर यांना स्वीकार केले, माकडाला भावाच्या रुपात स्वीकार केले.  हेच तर रामायण आहे जे मानवता कल्याणासाठी चांगले आहे. मात्र भाजप जे सांगते ते खूप वाईट आहे.

IPL_Entry_Point