मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  crackers free Diwali in Delhi : दिल्लीत यंदाही फटाकेमुक्त दिवाळी; फटाक्यांच्या वापरावर आप सरकारने आणली बंदी

crackers free Diwali in Delhi : दिल्लीत यंदाही फटाकेमुक्त दिवाळी; फटाक्यांच्या वापरावर आप सरकारने आणली बंदी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 07, 2022 01:44 PM IST

crackers free Diwali in Delhi : आप सरकारने यावर्षी दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचे ठरवले आहे. यासाठी फटाके विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी जानेवारी २०२३ पर्यन्त राहणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ट्विट करून या संबंधी माहिती दिली आहे,

दिल्लीत फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली जाणार आहे.
दिल्लीत फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली जाणार आहे.

दिल्ली : राजधानी दिल्लीत या वर्षीही फटाके मुक्त दिवाळी साजरी केली जाणार आहे. आप सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. ही बंदी जानेवारी २०२३ पर्यन्त राहणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ट्विट करून या बाबत माहिती दिली आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की फटाक्यांच्या ऑनलाइन विक्री आणि डिलीवरी सुद्धा बंदी आणण्यात आली आहे.

दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरण्यावर बंदी आणण्यात आली आहे. दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे जीव वाचतील असेही गोपाल राव यांनी स्पष्ट केले आहे. या निर्याणची अंमलबजावनी ही सक्तीने लागू केली जाणार आहे. या साठी दिल्ली पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. थेट विक्री सोबतच ऑनलाइन विक्रीवरही बंदी आणण्यात आली आहे.

या बाबतचे ट्विट गोपाल राय यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, दिल्लीतील नागरिकांना वाढत्या प्रदूषणापासून वाचंवण्यासाठी गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यात आला आहे. या साठी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या निर्मितिवर आणि साठवणूक आणि वापरण्यावर बंदी आणण्यात आली आहे. या मागे नागरिकांचा जीव वाचवण्याचा सरकारचा हेतु आहे. त्यामुळे यावेळी दिल्लीत ऑनलाइन विक्री आणि डिलिव्हरी यावरही बंदी घालण्यात आली आहे. जानेवारी २०२३ पर्यन्त ही बंदी लागू राहणार आहे. या प्रतिबंधाची कठोरपणे अमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी दिल्ली पोलिस, DPCC आणि महसूल विभागासोबत योजना बनवली जाणार आहे.

दिल्लीत हिवाळा सुरू झाला की हवेतील प्रदूषणातही वाढ होते. दिवाळीच्या दरम्यान श्वासघेणेही दिल्लीकरांना कठीण होते. प्रदूषणाचा स्थर हा या दरम्यान सर्वाधिक वाढतो. गेल्या वर्षीही फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणल्यात आली होती. या बंदिवरून राजकरणही तापले होते.

WhatsApp channel