मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BBC Documentary Row : जेएनयूनंतर जामिया विद्यापीठात जोरदार राडा; चार विद्यार्थ्यांना अटक
BBC Documentary On Gujarat Riots
BBC Documentary On Gujarat Riots (HT)

BBC Documentary Row : जेएनयूनंतर जामिया विद्यापीठात जोरदार राडा; चार विद्यार्थ्यांना अटक

25 January 2023, 19:23 ISTAtik Sikandar Shaikh

BBC Documentary Row : गुजरात दंगलीवर आधारीत बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून जेएनयूनंतर आता जामिया विद्यापीठातही विद्यापीठात विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्याची माहिती समोर आली आहे.

BBC Documentary On Gujarat Riots : गुजरातध्ये २००२ साली झालेल्या धार्मिक दंगलीवर बीबीसीनं एक डॉक्यूमेंट्री प्रदर्शित केली आहे. त्यात दंगलीवेळी तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता डॉक्यूमेंट्रीतून बीबीसी प्रपोगंडा पसरवत असल्याचा आरोप करत केंद्रातील मोदी सरकारनं त्याच्या भारतातील प्रसारणावर बंदी घातली आहे. डॉक्यूमेंट्रीवरून वाद पेटलेला असतानाच त्यावरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आता दिल्लीतील जामिया विद्यापीठात लॅपटॉपवरून डॉक्यूमेंट्री पाहणाऱ्यावरून विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीतील जामिया विद्यापीठात गुजरात दंगलीवरील डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रीनिंगमुळं वाद झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीनं विद्यापीठात धाव घेत चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. विद्यापीठ प्रशासनानं परवानगी नाकारलेली असतानाही डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रीनिंग केल्याचा आरोप विद्यार्थ्यांवर आहे. त्यापूर्वी विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यापूर्वी जेएनयूमध्ये डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर आता जामिया विद्यापीठातही वाद झाल्यामुळं त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

गुजरात दंगलीवर बीबीसीनं प्रदर्शित केलेल्या डॉक्यूमेंट्रीचा पहिला भाग काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेयर करण्यात आला होता. केंद्र सरकारनं त्यावर बंदी घातल्यानंतर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माहितीपटाच्या दोन्ही भागाच्या लिंक्स सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत. त्यामुळं आता बीबीसीच्या माहितीपटावरून दिल्लीत केवळ सत्ताधारी आणि विरोधकच नाही तर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा संधर्ष होत असल्याचं दिसून येत आहे.