ऐन दिवाळीतच LAC वरून चांगली बातमी... भारत-चीन सैनिकांनी एकमेकांना वाटली मिठाई, सैन्य पूर्णपणे माघारी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ऐन दिवाळीतच LAC वरून चांगली बातमी... भारत-चीन सैनिकांनी एकमेकांना वाटली मिठाई, सैन्य पूर्णपणे माघारी

ऐन दिवाळीतच LAC वरून चांगली बातमी... भारत-चीन सैनिकांनी एकमेकांना वाटली मिठाई, सैन्य पूर्णपणे माघारी

Oct 31, 2024 06:36 PM IST

एप्रिल २०२० पूर्वीची परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्याला बरीच कसरत करावी लागणार आहे, त्यासाठी वेळ लागणार आहे. एलएसीवरून अतिरिक्त सैन्य परतल्यानंतर संघर्ष पूर्णपणे संपुष्टात येईल असे मानले जात आहे.

भारत चीनमधील सीमावाद निवळला (PTI Photo)
भारत चीनमधील सीमावाद निवळला (PTI Photo) (HT_PRINT)

भारत आणि चीन दरम्यानच्या नात्यावर चढलेली बर्फाची चादर आता हळू-हळू हटू लागली आहे. याचे स्पष्ट उदाहरण आज नियंत्रण रेषेवर (LAC)  पाहायला मिळाले. येथे दिवाळीनिमित्त भारतीय आणि चीनी सैनिकांना एकमेकांना मिठाई वाटली. दोन्ही देशांनी लडाखमधील दोन संवेदनशील प्वॉईंट डेमचोक आणि देपसांग मैदानांवरील अलगीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. दिवाळीच्या निमित्त असे दृष्य समोर आले जे राजकीय मुत्सदेगिरीचा परिणाम मानले जात आहे. रिपोर्टनुसार चूशुल-मोल्डो सीमा बैठक स्थळावर मिठायांचे आदान-प्रदान केले गेले.

दिवाळीपूर्वी भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवरील गोठलेला बर्फ वितळला आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) देपसांग आणि डेमचोक या दोन ठिकाणांहून भारत-चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळी पूर्ण झाली आहे. आता पूर्वीप्रमाणेच दोन्ही ठिकाणी गस्त सुरू करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांचे तोंड गोड केले. 

भारत आणि चीन यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत सैन्य माघारी घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सोमवारी परराष्ट्र सचिवांनी या कराराची घोषणा केली आणि मंगळवारपासून सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली. नियोजित वेळापत्रकानुसार हे काम पूर्ण झाले आहे. या करारानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात कझानमध्ये झालेल्या चर्चेतही त्याची जलद अंमलबजावणी झाली.

हवाई सर्वेक्षण आज पूर्ण होण्याची शक्यता -

लष्कराच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की, दोन्ही ठिकाणचे सैन्य मागे हटले आहे. म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये ते जिथे होते त्या ठिकाणी परतले आहेत. सैन्य माघारी गेल्यानंतर दोन्ही बाजू त्याला दुजोरा देत आहेत, त्यासाठी हवाई सर्वेक्षण केले जात आहे. ही प्रक्रियाही गुरुवारी पूर्ण होणे अपेक्षित आहे.

दोन्ही देशांच्या सैन्याच्या स्थानिक कमांडर्सच्या चर्चेनंतर गस्तीची पद्धत ठरविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ज्यानंतर ते सुरू होईल. लष्कराने कोणतीही तारीख दिलेली नसली तरी एक-दोन दिवसात ते प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. स्थानिक कमांडर सामान्यत: ब्रिगेडियरच्या खाली कर्नल दर्जाचे अधिकारी असतात. गलवान, पँगाँग लेक नॉर्थ, पँगाँग लेक साऊथ, हॉट स्प्रिंग आणि गोगरा येथून चीनी सैन्य माघारी गेले आहे. 

उर्वरित पाच ठिकाणीही गस्त सुरू करण्यात येणार आहे, मात्र तो या कराराचा भाग नाही. त्यासाठी भारत आणि चीनमध्ये स्वतंत्र चर्चा सुरू आहे.

पुढे काय होणार :-

  • आता एप्रिल २०२० प्रमाणे डेपसांग आणि डेमचोकवर लवकरच गस्त सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक कमांडर चर्चा करून गस्तीची पद्धत ठरवतील.
  • आणखी एक मोठे पाऊल म्हणजे डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य कमी करणे. दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या जुन्या ठिकाणी परतले असले तरी तेथे ५०-५० हजार सैन्य उपस्थित आहे. त्यात टप्प्याटप्प्याने कपात करावी लागेल. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये स्वतंत्रपणे चर्चा सुरू होणार आहे.
  • या प्रदेशात दोन्ही देशांच्या सैन्याच्या अनेक ठिकाणी नवीन पोस्ट बांधण्यात आल्या आहेत, त्या ही हटवाव्या लागतील.

• उर्वरित पाच ठिकाणीही हीच संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल.

देपसांग आणि डेमचोकमधून सैन्य मागे घेणे हे अतिशय सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे उर्वरित प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण एप्रिल २०२० पूर्वी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्याला बरीच कसरत करावी लागणार आहे, त्यासाठी वेळ लागणार आहे. एलएसीवरून अतिरिक्त सैन्य परतल्यानंतर संघर्ष पूर्णपणे संपुष्टात येईल असे मानले जाईल. असे लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंह (निवृत्त) यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर