मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेवंत रेड्डींचे अभिनंदन करणारे तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित, निवडणूक आयोगाची कारवाई

रेवंत रेड्डींचे अभिनंदन करणारे तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित, निवडणूक आयोगाची कारवाई

Dec 03, 2023 06:06 PM IST

Anjani Kumar Suspended : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनाआचारसंहिता नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

रेवंत रेड्डींची भेट घेताना अंजनी कुमार
रेवंत रेड्डींची भेट घेताना अंजनी कुमार

तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणीही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अंजनी कुमार यांना निलंबित केले आहे. याबाबतचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. विशेष म्हणजे आज दुपारीच अंजनी कुमार यांनी काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. यानंतर आयोगाने ही कारवाई केली.

 

ट्रेंडिंग न्यूज

तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार,राज्य पोलीस नोडल अधिकारी संजय जैन,महेश भागवत यांनी तेलंगणामधील काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. त्‍यांच्‍या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून त्‍यांचे अभिनंदन केले. त्‍यांनी केलेली कृती ही आचारसंहितेचा भंग करणारी ठरली असल्‍याचे निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे.

 

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर