जगभरात डिंगा डिंगा व्हायरसची दहशत, संसर्ग होताच नाचू लागतात रुग्ण; स्त्रिया आणि लहान मुलांना धोका!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जगभरात डिंगा डिंगा व्हायरसची दहशत, संसर्ग होताच नाचू लागतात रुग्ण; स्त्रिया आणि लहान मुलांना धोका!

जगभरात डिंगा डिंगा व्हायरसची दहशत, संसर्ग होताच नाचू लागतात रुग्ण; स्त्रिया आणि लहान मुलांना धोका!

Dec 19, 2024 06:00 PM IST

Dinga Dinga Virus: आफ्रिकेत युगांडामध्ये एक नवीन विषाणू पसरत आहे. या विषाणूचे नाव डिंगा डिंगा आहे. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे शरीर थरथरू लागते.

जगभरात डिंगा- डिंगा व्हायरसची दहशत
जगभरात डिंगा- डिंगा व्हायरसची दहशत (AP)

Dinga Dinga Virus Updates: आफ्रिकेतील युगांडामध्ये युगांडामध्ये एका विचित्र आजाराने थैमान घातले आहे. या आजाराला डिंगा- डिंगा, असे नाव देण्यात आले आहे. या आजारापासून स्त्रिया आणि लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. डिंगा- डिंगा आजारामुळे शरीरावरील नियंत्रण सुटते आणि चालण्यात अडचणी येतात. त्यामुळे बाधित रुग्ण नृत्य करत असल्यासारखा वाटतो, अशी प्राथमिक माहिती आहे. या आजाराने जगभरातील लोकांना चिंतेत टाकले आहे.

फर्स्टपोस्ट इंग्लिशच्या रिपोर्टनुसार, युगांडाच्या बुंदीबुग्यो जिल्ह्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचा विचित्र आजार आढळून आला. या आजाराने बाधित झालेले रुग्ण नृत्य करत असल्यासारखा वाटतो. याशिवाय, त्यांना खूप ताप येतो आणि अशक्तपणा जाणवतो. महत्त्वाचे म्हणजे, या आजारामुळे काही लोकांना अर्धांगवायू देखील होतो. या आजारामुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार हा आजार आफ्रिकन देशात वेगाने पसरत आहे, तेथील आरोग्य अधिकारी या आजारामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

रुग्णाने शेअर केला अनुभव

डिंगा- डिंगा आजाराच्या विळख्यात सापडलेल्या एका रुग्णाने या आजाराशी संबंधित त्याचा वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की, सुरुवातीला त्याला अर्धांगवायू झाला आणि त्यानंतर त्याचे शरिर थरथरायला लागले. स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना संबंधित तरुणाने म्हटले की, 'त्याला खूप अशक्तपणा जाणवत असून चालताना त्रास होत आहे. मला उपचारासाठी बुंदीबुग्यो रुग्णालयात आणण्यात आले आणि देवाचे आभार मानतो की मी आता ठीक आहे.'

आतापर्यंत ३०० प्रकरणाची नोंद

युगांडातील बुंदीबुग्योमध्ये डिंगा- डिंगाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३०० जण बाधित झाले आहेत. २०२३ च्या सुरुवातीला सर्वात प्रथम या आजाराशी संबंधित रुग्ण आढळून आला. या आजाराचे कारण शोधण्यासाठी आरोग्य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. पुढील विश्लेषणासाठी नमुने युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत.

याआधी २०१९ साली चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाच्या तोंडचे पाणी पळवले होते. जगभरातील कोट्यावधी लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. एवढेच नव्हेतर, महासत्ता असलेल्या अमेरिकासारख्या देशालाही या आजारामुळे मोठा आर्थिक फटका बसला होता. यामुळे कोणत्याही नव्या आजाराबाबत ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो.

 

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर