नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने प्रवाशांच्या सोयीसाठी नवे एसओपी जारी केले आहेत. गोवा-दिल्ली इंडिगो फ्लाइट मुंबईत हायव्हर्ट केल्यानंतर प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर DCGA ने मोठा निर्णय घेत नव्या सूचना जारी केल्या आहेत. आता विमानाचं उड्डाण कोणत्याही कारणानं जर विलंबाने होणार असेल तर संबंधित एअरलाइन्स प्रवाशांना व्हॉट्सॲपवर मेसेज करणार आहे. DCGAने दिलेल्या एसओपीचं सर्व एअरलाइन्स कंपन्यांना पालन करणे अनिवार्य आहे.
DGCA संचालक अमित गुप्ता यांनी जारी केलेल्या डीजीसीएच्या एसओपीनुसार, विमानाच्या उड्डाणाला उशीर होणार असल्यास, त्याचे कारण प्रवाशांना सांगणे गरजेचे आहे. यासाठी DGCA ने CAR जारी केली आहे. प्रवाशांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फ्लाइटच्या विलंबाची माहिती दिली जाईल.
खराब हवामानामुळे तीन तासांपेक्षा जास्त उशीर होणार असल्यास उड्डाण रद्द करता येईल, परंतु प्रवाशांना त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.
विमानाच्या उड्डाणाला विलंब होणे, कोणत्याही कारणाने रद्द होणे अशा परिस्थितीत प्रवाशांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना DGCA ने दिल्या आहेत. विमानाच्या उड्डाणाला विलंब होत असल्यास एअरलाईन्सने प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात असं नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने म्हटलं आहे. हे नियम सर्व एअरलाईन्स कंपन्यांना बंधनकारक असणार आहेत.