कपड्यांशिवाय झोपवलं, २० दिवस केले अमानुष अत्याचार; अमेरिकेहून परतलेल्या भारतीयाने कथन केल्या मरणयातना
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कपड्यांशिवाय झोपवलं, २० दिवस केले अमानुष अत्याचार; अमेरिकेहून परतलेल्या भारतीयाने कथन केल्या मरणयातना

कपड्यांशिवाय झोपवलं, २० दिवस केले अमानुष अत्याचार; अमेरिकेहून परतलेल्या भारतीयाने कथन केल्या मरणयातना

Published Feb 07, 2025 07:13 AM IST

Indian return From US: अमेरिकेत अवैधरित्या गेललेल्या भारतीयांना विशेष विमानाने भारतीयांनी परत पाठवले आहेत. या परत आलेल्या भारतीयांनी त्यांच्यावर काय काय बेतलं याची करून कहाणी कथन केली आहे.

कपड्यांशिवाय झोपवलं, २० दिवस केले अमानुष अत्याचार; अमेरिकेहून परतलेल्या भारतीयाने कथन केल्या मरणयातना
कपड्यांशिवाय झोपवलं, २० दिवस केले अमानुष अत्याचार; अमेरिकेहून परतलेल्या भारतीयाने कथन केल्या मरणयातना

Indian return From US: अमेरिकेत अवैधरित्या घुसलेल्या भारतीयांना एका विशेष विमानाने परत भारतात पाठवण्यात आले आहे. या परत आलेल्या भारतीयांनी त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंग माध्यमांपुढे कथन केला आहे.  

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील पुरकाझी भागातील मरकपूर गावात राहणारा ३८ वर्षीय देवेंद्र याला अमेरिकेतून परत भारतात पाठवण्यात आलं आहे. परदेशात पाठवणाऱ्या गिल टोळीला बळी पडून तो अमेरिकेत पोहोचला होता. मात्र, अमेरिकेच्या पोलिलिसांनी त्याला अटक केली होती.  देवेंद्र याला  गुरुवारी  परत भारतात पोहोचवण्यात आलं. यानंतर तो आपल्या गावी पोहोचला. अमेरिकेत जाण्यासाठी  देवेंद्रने  आतापर्यंत ४० लाख रुपय परदेशी पाठवणाऱ्या दलाला दिले आहेत.  अमेरिकेतील कॅलिफोर्नियायेथे बॉर्डर फोर्स आणि अमेरिकन आर्मीकडून तब्ब्ल २० दिवस त्याचा छळ करण्यात आला. हा छळ अमानुष होता. त्यांच्या अंगावरचे कपडे काढण्यात आले. तर त्यांना बेड्या घालून विमानात बसवण्यात आलं होतं. हे दिवस आम्ही मरणयातना भोगल्याचे देवेंद्रने सांगितलं. 

परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक 

परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांच्या तावडीत अडकल्याचे देवेंद्र याने सांगितले. कॅलिफोर्नियात काम करून मोठी कमाई करण्याच्या इच्छेने मेक्सिकोत राहणाऱ्या पंजाबच्या गिल टोळीच्या माध्यमातून २९ नोव्हेंबर रोजी थायलंडला पोहोचल्याचे देवेंद्रने पोलिसांना सांगितले. थायलंडमध्ये त्यांची भेट हरियाणा, गुजरात आणि पंजाबमधील अनेक तरुणांशी झाली. दरम्यान, देवेंद्र इतर तरुणांसोबत थायलंडहून विमानाने चीनला पोहोचला. त्यानंतर १५  जानेवारीला तो विमानाने मेक्सिको सिटी सीमेवर पोहोचला.

देवेंद्र म्हणाला की, मेक्सिको सिटीजवळील तिजवाना सीमा अमेरिकेला लागून आहे. तेथील भिंत चढून त्याला अमेरिकेत पाठवण्यात आले, तेथे सीमेची  सुरक्षा करणाऱ्या  गस्ती पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यांनी त्याचा मोबाईल व कपडे जप्त केले. त्यांच्या अंगातील उबदार कपडे देखील अमेरिकन पोलिसांनी काढून घेतले.  अगदी बुटाच्या लेस काढून ट्रॅकसूटमध्येच राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याला लष्कराच्या ताब्यात देण्यात आले.

लष्कराने त्याला अमेरिकेतील एका मोठ्या हॉलमध्ये अनेक दिवस ठेवले. हॉलमध्येच सात वेगवेगळ्या बॅरेक होत्या. त्यात अमेरिकेत बेकायदा घुसखोरी करणारे अनेक जण होते. देवेंद्रने सांगितले की,  दिवसा बॅरेकमध्ये एसी चालू राहायचा, त्यामुळे सर्वजण थंड वातावरण राहायचे. तर रात्री गरम हीटर चालू ठेवला जात होता. अशा तऱ्हेने दिवसा किंवा रात्री तिथे कोणीही झोपू शकत नव्हतं. 

देवेंद्र म्हणाला की, सुमारे २० दिवस त्याचा छळ करण्यात आला. त्यानंतर सर्वांना बसमध्ये बसवून ३ फेब्रुवारी रोजी लष्कराच्या विमानाने भारताकडे रवाना करण्यात आले. अमेरिकन लष्कराने त्याला पंजाबमधील अमृतसर येथे सोडले. सुमारे १८ तासांच्या उड्डाणानंतर अमेरिकन विमानाने पुन्हा ऑस्ट्रिया किंवा ऑस्ट्रेलियात इंधन घेऊन उड्डाण केले.

पाच गुंठे जमीन विकून आरोपीला दिले पैसे

परदेशात पैसे कमावून कुटुंबाचे आर्थिक स्थिती  भक्कम करण्यासाठी देवेंद्रने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पाच गुंठे जमीन त्याने गहाण ठेवली होती. त्याने नातेवाईक आणि सावकारांकडून लाखो रुपये उधार घेऊन गिल यांना व्हिसासाठी दिले होते. देवेंद्र म्हणाले की, गिल टोळीचे पंजाबमध्ये मोठे जाळे आहे. गिल स्वत: मेक्सिकोमध्ये राहतात. ना नोकरी मिळाली, ना गहाण ठेवलेली जमीन परत करायची हिंमत, अशी खंत देवेंद्र यांना आहे. देवेंद्र यांना लहान भाऊ जगराज सिंह आणि पत्नी हरसिमरत कौर यांच्यासह दोन मुले आहेत. संपूर्ण कुटुंब शेती करते.

रक्षित हा  शहापूर (मुझफ्फरनगर) येथील असून त्याला देखील अमेरिकेतून भारतात पाठण्यात आले आहे. सध्या तो  मानसिक तणावाखाली आहे. अमेरिकेतून परतलेला रक्षित बालियान मानसिक तणावातून जात असून कुटुंबीयांनी त्याला गावापासून दूर मेरठमधील एका घरात पाठवले आहे. बुधवारी रात्री रक्षित आपल्या गावी रसूलपूर जतन येथे पोहोचला आणि संपूर्ण घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. रसूलपूर जतनयेथील रहिवासी सुधीर बालियान हे निवृत्त लष्करी अधिकारी असून ते मुलगा रक्षित बालियान, मुलगी आणि पत्नीसह मेरठमध्ये राहतात. सुमारे २० बिघा शेती असल्याने ते गावात येत असतात. रक्षित बालियान मेरठमध्ये राहून इंटरमीडिएटची परीक्षा उत्तीर्ण झाला. रक्षितला परदेशात जायचं होतं. सुमारे सात महिन्यांपूर्वी परदेशात पाठविणाऱ्या एका कंपनीने अमेरिकेत बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी मिळवून देणे आणि त्यांचा पासपोर्ट पूर्ण करणे आदी कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला अमेरिकेत पाठवले.

रक्षित अमेरिकेला गेला, पण या सात महिन्यांत त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. यावेळी तो कोठे राहत होता, त्याने काय केले, याबाबत घरच्यांनी काहीही सांगितले नाही. सुधीर बालियान सांगतात की, त्यांचा मुलगा मानसिक तणावातून जात आहे त्यामुळे तो कोणाशीही बोलत नाही. २०१७ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर मेरठमध्ये राहू लागलो. त्याला परदेशात पाठवण्यासाठी एजंटला किती पैसे दिले हे सांगण्यास त्याने नकार दिला. रक्षितचे वडील सुधीर बालियान यांनीही तो कोणत्या एजंट किंवा कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेत काम करण्यासाठी आला हे सांगण्यास असमर्थता दर्शवली.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर