मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Rahim: पॅरोलवर असलेल्या बलात्कारी राम रहीमचा जंगी बर्थ-डे; तलवारीनं कापला केक, व्हिडिओ व्हायरल

Ram Rahim: पॅरोलवर असलेल्या बलात्कारी राम रहीमचा जंगी बर्थ-डे; तलवारीनं कापला केक, व्हिडिओ व्हायरल

Jan 24, 2023 01:28 PM IST

Gurmeet Ram Rahim singh Cuts Cake With Sword, Video Viral : बलात्कार आणि हत्येप्रकरणी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला डेरा प्रमुख सध्या नव्या वादात अडकला आहे. सध्या पॅरोलवर बाहेर असलेल्या बाबा राम रहीमने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rape Convict Ram Rahim Cuts Cake With Sword, Video Goes Viral
Rape Convict Ram Rahim Cuts Cake With Sword, Video Goes Viral

Gurmeet Ram Rahim singh : खून आणि बलात्कार प्रकरणी २० वर्षांचा कारावासाची शिक्षा झालेला आणि सध्या पॅरोलवर सुटलेला डेरा सच्चा सौदाचा वादग्रस्त प्रमुख गुरमीत राम रहीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरमीत राम रहीम हा तलवारीने केक कापतांना या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे गुरमीत राम रहीम पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.

सिरसा-डेरा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सध्या हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगातून बाहेर आला आहे. गुरमीत राम रहीमवर बलात्कार आणि हत्येत दोषी आढळला असून त्याला या प्रकरणी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्याला स्थानिक न्यायालयाने नुकताच ४० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. २५ जानेवारी रोजी माजी डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे, त्यामुळे पॅरोल मंजूर व्हावा अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, एका कार्यक्रमात गुरमीत राम रहीम हा तलवारीने केक कापत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत तलवारीने केक कापण्यास बंदी असून हत्यारांचे प्रदर्शन केल्यामुळे गुरमीत राम रहीमच्या अडचणी आता आणखी वाढणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुरमीत राम रहीमने सोमवारी संप्रदायाच्या काही स्वयंसेवकांनी आयोजित काही राज्यांमध्ये स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार कृष्णलाल पनवार आणि माजी मंत्री कृष्ण कुमार बेदी यांच्यासह हरियाणातील भारतीय जनता पक्षाचे काही ज्येष्ठ नेते देखील उपस्थित राहिले होते.

गेल्या १४ महिन्यांत तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत राम रहीमला पॅरोल मंजूर होण्याची ही दुसरी वेळ आहे. हरियाणा पंचायत निवडणूक आणि आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी ऑक्टोबर २०२२ मध्ये राम रहीमला ४० दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते.

पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने ऑगस्ट २०१७ मध्ये राम रहीमला दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने २००३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने नोंदवलेल्या खटल्याच्या आधारे बाबा राम रहीमला दोषी ठरवले होते.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर