Police Viral Video: उत्तर प्रदेशमधील देवरिया येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीला शोधून आणणाऱ्या पोलीस पथकाने मुलीच्या आईकडून विमान प्रवास आणि इतर खर्चासाठी पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका तपास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. संबंधित मुलीचे तिच्या एका मित्राने अपहरण केल्याची महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. यानंतर मुलगी मुंबईत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर निलिबिंत तपास अधिकारी आणि इतर दोन पोलीस तिला परत आणण्यासाठी मुंबईत गेले होते.
देवरियाचे पोलीस अधीक्षक (एसपी) यांनी प्राथमिक चौकशीनंतर या प्रकरणाचे तपास अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांना निलंबित केले आहे. पोलिसांना विमान तिकिटासाठी २२ हजार रुपये, रेल्वे तिकिटासाठी ७ हजार रुपये आणि इतर खर्चासाठी ११ हजार रुपये देण्यासाठी आईला आपले दागिने गहाण ठेवावे लागले.
सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलीची आई असे सांगताना दिसत आहे की, पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्याकडून विमान आणि ट्रेनची तिकिटे आणि इतर खर्चासाठी एकूण ४० हजार रुपये घेतले आहेत. देवरिया सर्कल ऑफिसर यांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आणि सांगितले की, एसपींनी त्यांच्या देखरेखीखाली चौकशी सुरू केली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आईने २६ मे रोजी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. जुलै महिन्यात पोलिसांनी मुलीचे लोकेशन मुंबईत शोधून काढले आणि बाघोच घाट पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले पांडे आणि इतर दोन पोलिस तिला परत आणण्यासाठी शहरात गेले. तपास अधिकाऱ्याने आईशी संपर्क साधला होता आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली होती जेणेकरून ते मुंबईला जाऊ शकतील आणि मुलीला रेल्वेने परत आणू शकतील. १७ जुलै रोजी मुलीला देवरियायेथे आणण्यात आले.
बंगळुरूच्या कोरमंगला भागातील व्हीआर लेआऊट येथे पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीचा गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून अज्ञात हल्लेखोर हा मृत महिलेच्या ओळखीचा व्यक्ती असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मृत तरुणी मूळची बिहारची रहिवासी आहे. मंगळवारी रात्री ११.१० ते ११.३० च्या दरम्यान हल्लेखोराने तिचा गळा चिरून पळून गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. क्रिती कुमारी असे मृत मुलीचे नाव आहे. ती बंगळुरूतील एका खासगी कंपनीत कामाला होती. पोलीस अधिकारी तिचा मोबाइल फोन, कॉल रेकॉर्ड डिटेल्स तपासत आहेत.