ओला, उबेर, रॅपिडोच्या बाईक- टॅक्सी सेवेवर सुप्रीम कोर्टाची बंदी; 'या' शहरात धावणार नाही!
Bike Taxis Operating: सुप्रीम कोर्टाने दिल्लीत ओला, उबेर आणि रॅपिडो या कंपन्यांच्या बाईक सेवेवर बंदी घातली आहे.
New Delhi News: दिल्लीतील ओला, उबेर आणि रॅपिडो या कंपन्यांच्या बाईक सेवेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत बाइक टॅक्सी धावणार नसल्याचे स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्या न्यायालयामुळे कॅब अॅग्रीगेटर कंपन्यांना झटका बसला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सर्वोच्च न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान उबेरच्या वकिलांनी सांगितले की, २०१९ पासून अनेक राज्यांमध्ये दुचाकी सेवेसाठी दुचाकी वापरल्या जात आहेत. मोटार वाहन कायद्यांतर्गत यावर कोणतेही बंधन नाही. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, दुचाकी व्यावसायिक वापरासाठी वापरली जाऊ शकते. त्यावर सुप्रीम कोर्टाने विचारले की, वाहन एखाद्याला धडकले किंवा अपघात झाला तर विमा दिला जातो का? उबेरच्या वकिलाने सांगितले की उबर थर्ड पार्टी इन्शुरन्स देते, 35,000 पेक्षा जास्त ड्रायव्हर्स त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यावर अवलंबून आहेत. दिल्ली सरकारकडे 4 वर्षांपासून कोणतेही धोरण नाही, जोपर्यंत दिल्ली सरकार धोरण बनवू देत नाही तोपर्यंत आम्हाला दिलासा द्यावा, असेही उबेरच्या वकीलांनी म्हटले आहे.
दिल्ली सरकारच्या निर्णयाला स्थगिती देत दिल्ली उच्च न्यायालयाने पॉलिसी येईपर्यंत कॅब एग्रीगेटर कंपन्यांना बाईक सेवेला परवानगी दिली होती. ज्यांच्या विरोधात दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. फेब्रुवारी २०२३ मध्ये दिल्ली सरकारने ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या कॅब एग्रीगेटर कंपन्यांच्या बाइक सेवेवर बंदी घातली होती.