Delhi Earthquake : राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले. पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता मध्यम असली तरी इमारती व घरे शहारले. भूकंपाचे धक्के काही ठिकाणी तीव्र होते यामुळे साखर झोपेत असलेले नागरिक जागे होऊन भीतीने घराच्या बाहेर पळाले. भूकंपाचा केंद्रबिंदु दिल्लीत असल्याने एनसीआरमधील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या केंद्रबिंदुची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर होती. दिल्लीव्यतिरिक्त नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरिदाबादसह संपूर्ण परिसरात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिक झोपेतून जागे झाले. नागरिक घाबरले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नवी दिल्ली परिसरात होता. हे केंद्र अरावली परिसरातील धौला कुआंजवळील दुर्गाबाई देशमुख महाविद्यालयाच्या अगदी जवळ असल्याचे सांगितले जाते. जमिनीच्या पृष्ठभागापासून अवघ्या पाच किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदु होता. केंद्र नवी दिल्लीत असल्याने एनसीआरमध्ये याची तीव्रता खूप जास्त होती. जमिनीखाली प्लेट्स ची हालचाल झाल्याने मोठा आवाजही ऐकू आला. एकाच वेळी जाणवणारी तीव्र स्पंदने आणि विचित्र आवाज यामुळे लोक खूप घाबरले होते.
सुदैवाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नवी दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये जमिनी खालून जोरदार आवाज झाला व जमिन मोठ्या प्रमाणात शहराली. जमिनीखाली कंपन एवढ्या मोठ्याप्रमाणात होते की, लोक झोपेतून जागे झाले. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा नेपाळमध्ये होते. पण आज झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू राष्ट्रीय राजधानीतील नवी दिल्ली परिसरात होता.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील विक्रेते अनिश यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, "सर्व काही हादरत होते. मोठ्या प्रमाणात काही काळ हे धक्के जाणवले. नागरिक ओरडत व घाबरून घराबाहेर पडले. गाझियाबादमधील एका रहिवाशाने सांगितले की, "भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले... तसं कधीच वाटलं नाही... संपूर्ण इमारत हादरून गेली होती. लोकांनी आपले अनुभव ही सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. जमिन मोठ्या प्रमाणात हदारल्याने बहुतांश गाढ झोपेत असलेले लोक जागे झाले. तसेच काही जण जीवाच्या भीतीने घराबाहेर पळत सुटले. कुणाला मदतीची गरज असेल तर ११२ नंबरवर कॉल करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे अधिक धक्के जाणवू शकतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. दिल्ली-एनसीआर भूकंपीय झोन-४ मध्ये मोडते. भूकंपझोन ५ आणि ४ मध्ये भूकंपाचा धोका जास्त असतो.
संबंधित बातम्या