Viral Video: धावती मेट्रो बनली डब्लूडब्लूएफचं रिंगण; शिवीगाळ करणाऱ्या काकांना तरुणांनी चोपलं!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: धावती मेट्रो बनली डब्लूडब्लूएफचं रिंगण; शिवीगाळ करणाऱ्या काकांना तरुणांनी चोपलं!

Viral Video: धावती मेट्रो बनली डब्लूडब्लूएफचं रिंगण; शिवीगाळ करणाऱ्या काकांना तरुणांनी चोपलं!

Oct 01, 2024 12:41 PM IST

Delhi Metro Fighting Video: दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना दोन तरुणांनी एका व्यक्तीला मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ : मेट्रोत शिवीगाळ करणाऱ्या काकांना तरुणांनी चोपलं!
व्हायरल व्हिडिओ : मेट्रोत शिवीगाळ करणाऱ्या काकांना तरुणांनी चोपलं!

Delhi Metro Viral Video: उत्कृष्ट सुविधांसाठी प्रसिद्ध असलेली दिल्ली मेट्रो रोमान्स, हाणामारी आणि इतर गोष्टींसाठी अधिक चर्चेत असते. आठवडा उलटत नाही तोच, दिल्ली मेट्रो संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो.  असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोन तरुण एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. इतर प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला.

व्हायरल होत असलेल्या दीड मिनिटांचा आहे. व्हिडिओत दिसत आहे की, काही लोक मेट्रोच्या आतील दरवाजाजवळ उभे असल्याचे दिसत आहे. अचानक काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक माणूस आणि दोन तरुण यांच्यात वाद सुरू होतो. या दोन तरुणांसोबत एक तरुणी देखील आहे. हे तिघे काय बोलत आहेत हे व्हिडिओत स्पष्ट पणे ऐकू येत नाही. अचानक एक मुलगा काळ्या रंगाचा टीशर्ट घातलेल्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेला दुसरा तरुणही संबंधित व्यक्तीला मारहाण करतो. 

हा व्हिडिओ 'घर के कलेश' नावाच्या युजरने एक्सवर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काकांनी कथितरित्या मुलांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. चिराग नावाच्या एका युजरने लिहिले की, ‘मेट्रो आता मारहाणीसाठी ओळखली जात आहे. कोमलने लिहिले आहे की, ‘हे खूप कॉमन आहे.' भूमिने लिहिले आहे की, ‘ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे.’ 'दिल्ली मेट्रोचे आता स्वत:चे यूट्यूब चॅनेल असावे. अशा घटना फक्त दिल्ली मेट्रोमध्येच का घडतात?’

महिला एसएसआयचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

रोडवेज बस स्टॉपवर वरिष्ठ स्टेशन इन्चार्ज म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने कंडक्टरकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.एआरएमने चौकशी करून कारवाई करण्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ स्टेशन इन्चार्ज पुष्पांजली रोडवेजच्या चौकशी काऊंटरमध्ये बसून एका ऑपरेटरकडून पैसे घेताना दिसत आहेत. दररोज पैशांची मागणी करत असल्याचे रोडवेजचे चालक व परिचालकांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओवर महिला एसएसआय पुष्पांजली यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ कट रचून व्हायरल केला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एआरएम विपिन कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरएम यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर