Viral Video: रस्त्यावर लघवी करताना रोखलं म्हणून एका व्यक्तीला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: रस्त्यावर लघवी करताना रोखलं म्हणून एका व्यक्तीला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: रस्त्यावर लघवी करताना रोखलं म्हणून एका व्यक्तीला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Oct 06, 2024 09:45 PM IST

Delhi Man Brutally Thrashes Sleeping Man: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Viral News: राजधानी दिल्लीतील मॉडेल टाऊनमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यापासून रोखले म्हणून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव आर्यन आहे. तो मॉडेल टाऊन परिसरातील एका घरात नोकर म्हणून काम करतो. गुरुवारी तो याच परिसरातील एका उद्यानाजवळ लघवी करत होता. तेव्हा तेथील एका दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्याला लघवी करण्यापासून रोखले. यामुळे संतापलेल्या आर्यनने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

व्हायरल होत असलेला ५२ सेकंदाचा आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडल्याचे समजत आहे. आरोपी आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवरून रस्त्याच्या कडेला पोहोचला. उतरताच तो काठी घेऊन झोपलेल्या व्यक्तीकडे जातो. त्याचे दोन मित्र दुचाकीवर थांबतात. त्यानंतर आर्यन रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरूवात करतो. त्यानंतर तो दुचाकीवरून पळून जातो. सीसीटीव्हीत दिसणारा आर्यनला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर