मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Liquor Policy : दिल्ली मद्य धोरण भ्रष्टाचार तपासात ईडीची एंट्री; दिल्लीसह देशभरात ३० ठिकाणी छापे

Delhi Liquor Policy : दिल्ली मद्य धोरण भ्रष्टाचार तपासात ईडीची एंट्री; दिल्लीसह देशभरात ३० ठिकाणी छापे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 06, 2022 11:56 AM IST

Delhi Liquor Policy : दिल्ली मद्य धोरण भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयकडून आतापर्यन्त चौकशी सुरू होती. मात्र, आता यात ईडीनेही एंट्री केली आहे. दिल्ली-एनसीआर सोबत देशातील अनेक राज्यात ३० पेक्षा जास्त ठिकानांवर ईडीने छापे मारले आहेत.

मनीष सिसोदीया
मनीष सिसोदीया

दिल्ली : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील (Liquor Policy) कथित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय नंतर ईडीने (ED) आता तपास करण्यास सुरुवात केली आहे. ईडीच्या पथकाने दिल्ली-एनसीआरसह देशभरात 30 ठिकाणी छापेटाकले आहेत. दिल्लीसह लखनऊ, गुरुग्राम, चंदिगड, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूमध्ये छापेमारी सुरू आहे. दरम्यान, दिल्ली सरकारनं जाहीर केलेल्या अबकारी धोरणावर भाजपकडून टीका केली जात होती. त्या नंतर हे छापे टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दिल्ली सरकारच्या मद्य धोरणविरोधात भाजपने आंदोलने सुरू केली आहे. देशभरातील दारू व्यवसायिकांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यात दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ तसेच मुंबई, बेंगलुरु आणि हैदराबाद येथेही ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. या पूर्वी या प्रकरणाचा तास सीबीआई मार्फत सुरू होता. आता ईडीही या प्रकरणार सक्रिय झाली आहे. सीबीआयने या पूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापे टाकले होते. सीबीआई ने सिसोदिया यांचे लॉकरही या प्रकरणी तपासले आहेत. या प्रकरणी १२ पेक्षा अधिक जणांवर तसेच कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समीर महेंद्रू यांच्या घरावरही धाडी

ईडीने सीबीआयने दाखल केलेली एफआयआर टेकओवर केली आहे. दिल्लीच्या जोरबाग येथील दारू व्यावसायिक आणि या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी समीर महेंद्रू यांच्या घरी सुद्धा ईडीचे पथक पोहचले आहे. त्यांच्या घरातील एका सदस्याला घेऊन ईडीचे एक पथक हे दुसऱ्या ठिकाणी गेले आहे. समीर महेंद्रू यांचे नाव हे सीबीआयच्या एफआयआर मध्ये दाखल आहे. त्यांच्या एका खात्यावर तब्बल १ कोटी रुपये हे ट्रांसफर करण्यात आले होते.

एक दिवसापूर्वी भाजपने उघड केले होते स्टिंग ऑपरेशन

ईडी ने छापेमारी करण्याच्या एक दिवसा आधी भारतीय जनता पक्षाने एका दारू व्यवसायिकाच्या वडिलांचे स्टिंग ऑपरेशनचा एक व्हिडओ बाहेर काढला होता. या व्हिडिओ प्रकरणी भाजपने दावा केला आहे की, या व्यवसायिकाचे वडील हे कबूल करत आहेत की 'आप' सरकार नव्या मद्य धोरणांतर्गत कमीशन घेत होते. तसेक व्यवसायिकाची लूट केली जात होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग