
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना खिसेकापू संबोधणे राहुल गांधी यांच्या चांगलंच अंगलट आले आहे. याप्रकरणी दिल्ली हाय कोर्टाने गुरुवारी निवडणूक आयोगाला आदेश दिला की, राहुल गांधी यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करा.राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत गौतम अदानींचा उल्लेख करताना पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती.
कार्यवाहक मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, याबाबत राहुल गांधी यांना नोटीसही जारी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या पीठाने आदेश दिला की, नोटिशीला उत्तर देण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत योग्य कारवाई करावी.
राहुल गांधी यांनी २२ नोव्हेंबर रोजी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना गेल्या महिन्यात कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. दरम्यान,उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला या प्रकरणावर आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्यास सांगितलं आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ३१ नोव्हेंबर रोजी एका सभेत म्हटले होते की, पीएम चा अर्थ पनवती आहे. मोदी
टीव्हीवर येतात व हिंदू-मुस्लिम म्हणतात कधी-कधी क्रिकेट सामना पाहायला जातात, ही वेगळी गोष्ट आहे की, हरवले. मोदींचे काम लोकांचे लक्ष भटकवणे आहे. असे दोन खिसेकापू असतात. एक तुमच्या समोर येतो. तुमचे ध्यान भटकवतो. तोपर्यंत दुसरा येऊन तुमचा खिसा कापून नेतो. त्याचबरोबर पंतप्रधानांनी ‘अतिश्रीमंतांना कर्जमाफी दिली’ अशी टीका केली होती.
संबंधित बातम्या
