मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का? न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

प्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का? न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 17, 2024 03:30 PM IST

Boy Friend Suicide : उच्च न्यायालयाने म्हटले की, जर प्रेमात अपयश आल्यानंतर तरुण आत्महत्या करत असेल तर याप्रकरणी महिलेला दोषी धरता येणार नाही.

प्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का?
प्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का?

प्रेमसंबंधांबाबत दिल्ली हायकोर्टाने (Delhihighcourt) महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. एक खटल्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने म्हटले की, जर प्रेमात अपयश आल्यानंतर तरुण आत्महत्या करत असेल तर याप्रकरणी महिलेला दोषी धरता येणार नाही. मृत तरुणाने सुसाइड नोटही लिहिली होती, त्यामध्ये आपल्या मृत्यूसाठी महिलेसोबत एका अन्य व्यक्तीला जबाबदार धरले होते.

ट्रेंडिंग न्यूज

लाइव्ह लॉ च्या रिपोर्टनुसार, हायकोर्टात सुनावणी करत असलेल्या जस्टिस अमित महाजन यांनी म्हटले की, जर एखाद्या कमकुवक मनाचा व्यक्ती असे पाऊल उचलत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला दोषी धरता येत नाही. कोर्टाने म्हटले की, जर एखादा प्रियकर प्रेमात धोका मिळाल्याने किंवा प्रेम यशस्वी झाले नाही म्हणून आत्महत्या करतो, विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने आत्महत्या करतो, कोर्टात केस हरल्यानंतर जर कोणी आत्महत्या करत असेल तर अशा प्रकरणांमध्ये महिला,पर्यवेक्षक,वकील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जबाबदार धरता येणार नाही.

कोर्टाने म्हटले की, कमकुवत मानसिकतेच्या व्यक्तीकडून उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे दुसऱ्या व्यक्तीला जबाबदार धरता येत नाही. न्यायालयाने महिला आणि एक अन्य पुरुषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन दिला आहे.

काय आहे प्रकरण –

मृत तरुणाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. महिला सुसाइड करणाऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये होती. तर दुसरा संशयित दोघांचा कॉमन फ्रेंड होता. त्यांच्यावर आरोप होते की, दोघांनी मृत तरुणाला दोघांनी असे सांगून आत्महत्या करायला भाग पाडले की, दोघांच्या शारीरिक संबंध आहेत व लवकरच दोघे विवाह करणार आहेत.

कोर्टाने म्हटले की,WhatsApp चॅट्सवरून प्राथमिक दृष्टया समजते की, मृत तरुण खूपच संवेदनशील मनाचा होता. जेव्हा कधी महिला त्याच्याशी बोलण्यास नकार देत असे तो तिला आत्महत्या करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. कोर्टाने म्हटले की, कथित सुसाइड नोटमधील तथ्य ट्रायल दरम्यान तपासले जातील. त्याचबरोबर हे सुद्धा पाहिले जाईल की, आरोपींकडून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले होते की नाही.

IPL_Entry_Point