मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कुटुंबासमोर लैंगिक आयुष्याबद्दल बोलणे, पतीला नपुंसक म्हणणे ही क्रूरता : उच्च न्यायालय

कुटुंबासमोर लैंगिक आयुष्याबद्दल बोलणे, पतीला नपुंसक म्हणणे ही क्रूरता : उच्च न्यायालय

Mar 25, 2024 12:59 PM IST

Delhi High Court : आयव्हीएफ प्रक्रियेतून दोन वेळा गेल्यानंतरही दोघांनाही मूल होऊ शकले नाही, यावरून पती पत्नीत मतभेद सुरू झाले. पतीने आरोप केला आहे की, पत्नी सतत घरच्यांसमोर नपुंसक म्हणत सर्वांसमोर त्याचा अपमान करत होती.

कुटुंबासमोर लैंगिक जीवनाबद्दल बोलणे, पतीला नपुंसक म्हणणे क्रूरता; दिल्ली कोर्टाचा निर्णय
कुटुंबासमोर लैंगिक जीवनाबद्दल बोलणे, पतीला नपुंसक म्हणणे क्रूरता; दिल्ली कोर्टाचा निर्णय

Delhi High Court : घटस्फोटाशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पतीला जाहीरपणे नपुंसक म्हणणे किंवा शारीरिक संबंधांबद्दल जाहीर बोलणे हे मानसिक क्रौर्य असल्याचं न्यायालयानं म्हटले आहे. पत्नी चिडचिडी स्वभावाची असून छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करत असल्याचा आरोप पतीनं केला आहे. ती अतिशय असभ्य पद्धतीने बोलत असल्याचा आरोप देखील त्याने केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

mahakal temple fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठी दुर्घटना; होळी खेळताना गर्भगृहात आग, १३ पुजारी होरपळले

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर पतीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अपिलावर सुनावणी झाली. न्यायालयाने हिंदू विवाह कायदा १९५५ अंतर्गत पत्नीने पतीला दिलेल्या क्रूरतेच्या कारणास्तव तिला घटस्फोट मंजूर केला. पतीची घटस्फोटाची याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केला होता.

Amravati accident : मेळघाटात भीषण अपघात! कार दुचाकीच्या धडकेत चार जण ठार; होळीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

न्यायालयाने म्हटले आहे की, 'आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की, पत्नीने सर्वांसमोर पतीचा अपमान करणे आणि त्याला नपुंसक म्हणणे आणि कुटुंबातील सदस्यांसमोर लैंगिक जीवनाबद्दल उघडपणे बोलणे याला अपमानास्पद कृत्य म्हटले जाऊ शकते. त्यामुळे अपीलकर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला.' दोघांनी २०११ मध्ये लग्न केले.

लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, दोनदा आयव्हीएफ प्रक्रियेतून गेल्यानंतरही दोघांनाही मूल होऊ शकले नाही, त्यामुळे पती आणि पत्नीत मतभेद सुरू झाले.तसेच मोठे वाद देखील होऊ लागले. पतीने आरोप केला आहे की, पत्नी सतत त्याला नपुंसक म्हणत सर्वांसमोर त्याचा अपमान करत होती. यामुळे त्याला जो सार्वजनिक अपमान सहन करावा लागला, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे त्याला घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे.

WhatsApp channel
विभाग