दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का बसला आहे. केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून दिल्ली सरकार व आम आदमी पक्षामध्ये खूप काही अंतर्गत घडामोडी घडत आहेत. आता दिल्ली सरकारमधील मंत्री राज कुमार आनंद यांनी मंत्रीपदाचा आणि आपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. त्यानंतर त्यांनी आत मंत्रिमदाचा राजीनामा देत पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केजरीवाल यांनी आठवड्यातून पाच वेळा वकिलांना भेटण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. मात्र कोर्टाने ही मागणी आजफेटाळून लावली. त्याचबरोबर जामीनासाठी केलेली याचिकाही फेटाळली आहे. त्यातच आज त्यांनी तिसरा धक्का बसला आहे. दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राज कुमार आनंद यांनी मंत्रिपदाचा व पक्षाचा राजीनामा दिला आहे.
राज कुमार आनंद दिल्लीतील समाजकल्याण आणि कामगार मंत्री होते. त्यांच्या घरी ईडीने गेल्यावर्षी ३ नोव्हेंबर रोजी छापेमारी केली होती. ७ कोटींहून अधिकची सीमाशुल्काची चोरी केल्याचा आरोप आनंद यांच्यावर आहे.
आनंद यांनी पक्षावर गंभीर आरोप करताना म्हटले की, पक्षात दलित आमदार, खासदार आणि मंत्र्यांना योग्य सन्मान मिळत नाही. दलितांना फसविण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात राहणे मुश्किल झाले आहे. यासाठी मी मंत्रीपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.आनंद म्हणाले आम आदमी पक्ष भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला आहे. त्याबद्दल मी अधिक काही बोलू शकत नाही. कालपर्यंत मला वाटत होते की, आम्हाला कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करत आहे, मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वाटते की, काहीतरी गडबड आहे.
राजकुमार आनंद यांनी आपवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांनी पक्ष सोडला आहे. राजकुमार आनंद दिल्लीतील पटेल नगरमधून आमदार आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती. ईडीने त्याच्या दिल्लीतील निवासस्थानासह अन्य ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यांच्यावर हवालाच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेच्या सीमा शुल्क चोरीचा आरोप करण्यात आला आहे. ईडीने नोव्हेंबर २०२३ मध्ये महसूल व गुप्तचर संचालनालय (डीआरआय) द्वारे दाखल चार्जशीटच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंग कायदा (पीएमएलए) च्या तपासानुसार राजकुमार आनंद यांच्या अनेक ठिकाणांची झडती घेतली होती. डीआरआयने आरोप केला आहे की, आनंद यांनी काही वस्तुंच्या इम्पोर्टमध्ये चुकीची माहिती दिली, याद्वारे ७ कोटी रुपयांहून अधिकची सीमा शुल्क चोरी झाली.
राज कुमार आनंद यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये राजेंद्र पाल गौतम यांच्या जागी मंत्रीपदाची शपथ घेतली होती, राजेंद्र पाल यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये एका धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी समाज कल्याण मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
संबंधित बातम्या