दिल्लीतील मुस्लिमांचा काँग्रेसला ठेंगा, भाजपच्या पारड्यात टाकले मतांचे दान! EXIT POLL मध्ये धक्कादायक दावा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दिल्लीतील मुस्लिमांचा काँग्रेसला ठेंगा, भाजपच्या पारड्यात टाकले मतांचे दान! EXIT POLL मध्ये धक्कादायक दावा

दिल्लीतील मुस्लिमांचा काँग्रेसला ठेंगा, भाजपच्या पारड्यात टाकले मतांचे दान! EXIT POLL मध्ये धक्कादायक दावा

Published Feb 05, 2025 10:35 PM IST

Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. आता ८ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार की अडीच दशकांनंतर भारतीय जनता पक्षाला राजधानीत कमळ फुलवता येणार हे कळेल.

दिल्ली मुस्लिम मतदार
दिल्ली मुस्लिम मतदार (PTI)

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. आता ८ फेब्रुवारीला मतमोजणीनंतर अरविंद केजरीवाल चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार की अडीच दशकांनंतर भारतीय जनता पक्षा सत्तेचा दुष्काळ संपववून दिल्लीत कमळ फुलवणार हे समजेल. मात्र, बहुतांश एक्झिट पोलमध्ये यंदा दिल्लीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होईल, असा अंदाज मेटराइजच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

काय म्हणतो मेटराइज सर्वे -

या सर्व्हेनुसार भाजप आणि 'आप'मध्ये चुरशीची लढत असून, त्यात भगव्या पक्षाला किंचित आघाडी मिळू शकते. एक्झिट पोलमध्ये भाजपला ३५ ते ४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पक्षाला ३२ ते ३७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला ० ते १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसहून भाजपला अधिक मुस्लिम मतदान: एक्झिट पोल

या संपूर्ण निवडणुकीत मुस्लीम मतदारांची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न राहिला. २०२० मध्ये झालेल्या दंगलीनंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील मुस्लीम मतदारांना 'आप' सोडून काँग्रेसमध्ये परतणार का, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मेटराइज सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. याचे निष्कर्ष थोडे आश्चर्यकारक आहेत.

या सर्व्हेनुसार मुस्लिम मतदारांनी काँग्रेसपेक्षा भाजपवर जास्त विश्वास ठेवला आहे. एक्झिट पोलनुसार ६७ टक्के मुस्लिमांनी आम आदमी पक्षाला मतदान केले. त्यामुळे ९ टक्के मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली. तर ११ टक्के मुस्लिमांनी यावेळी भाजपला दिल्लीत आणण्यासाठी कमळाचे बटण दाबले आहे. इतरांना १३ टक्के मुस्लीम मते मिळण्याची शक्यता आहे.

मुस्लिमांची भाजपशी जवळीक वाढत आहे का?
अशा परिस्थितीत मुस्लिम भाजपच्या अधिक जवळ येत आहेत का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्येही हे दिसून आले आहे. अलीकडच्या काळात भाजपने अनेक मुस्लीमबहुल जागा जिंकल्या आहेत, तर अनेक निवडणूकोत्तर सर्वेक्षणांमध्येही मोठ्या संख्येने मुस्लिमांनी भाजपला मतदान केल्याचे समोर आले आहे. तिहेरी तलाकविरोधी कायद्यामुळे मुस्लीम महिला भाजपला मतदान करू लागल्याचे मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यासपीठावरून अनेकदा याचा उल्लेख केला आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर