दिल्लीच्या नैर्ऋत्य जिल्ह्यातील डिअर पार्कमध्ये एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मुलगा आणि एका मुलीचे मृतदेह आढळले. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत आहे. पुढील तपास सुरू आहे. उद्यानात अचानक एका मुला-मुलीचे मृतदेह सापडल्याने स्थानिकही हैराण झाले आहेत. या दोघांचे मृतदेह झाडावर सापडल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने सर्वप्रथम दिली.
आज सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी बलजीत सिंग (वय ३५, रा. हौज खास गाव, दिल्ली) यांनी पीसीआर कॉल करून एक मुलगा आणि एक मुलगी झाडाच्या फांदीवर लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती दिली. फोन येताच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
झाडाला लटकलेल्या मुलाची आणि मुलीची ओळख पटली आहे. दीपक असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय २१ वर्षे असून तो दिल्लीतील झोपडपट्टी क्रमांक ५, पिलांजी गाव, घर क्रमांक १७११ मध्ये राहत होता. भाऊ गणेश यांनी सांगितले की, दीपक काल दुपारी दोनच्या सुमारास घरातून निघाला. दीपक लोधी कॉलनीतील एका पिझ्झा शॉपमध्ये कामाला होता. मुलीचे वय १८ वर्षे असून तिचे नाव सिरजना आहे. ही मुलगी घर क्रमांक १७२, गल्ली नंबर 1, छतरपूर एन्क्लेव्ह, फेज 2, छतरपूर, दिल्ली येथील रहिवासी आहे. तिची बहीण सपना हिने सांगितले की, सिरजना गेल्या तीन दिवसांपासून एसजेईच्या हुमायूंपूर गावात आपल्या मावशीकडे राहत होती. कामानिमित्त छतरपूर एन्क्लेव्हयेथे जाण्याच्या उद्देशाने ती काल दुपारी दोनच्या सुमारास मावशीच्या घरातून निघाली होती.
मुलाने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती, तर मुलीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे पोलिसांना आढळले. एकाच नायलॉन दोरीने दोघेही झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळले. गुन्हे पथकाला तपासणीसाठी पाचारण करण्यात आले असून मृतदेह शवागारात पाठविण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. पुढील कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.
संबंधित बातम्या