मैत्रिणीने बोलणे बंद केले म्हणून चिडलेल्या तरुणाने तिच्यासह आई-वडिलांवर घरात घुसून केला चाकू हल्ला-delhi crime news man attackes with sharp weapon female colleague and her parents ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मैत्रिणीने बोलणे बंद केले म्हणून चिडलेल्या तरुणाने तिच्यासह आई-वडिलांवर घरात घुसून केला चाकू हल्ला

मैत्रिणीने बोलणे बंद केले म्हणून चिडलेल्या तरुणाने तिच्यासह आई-वडिलांवर घरात घुसून केला चाकू हल्ला

Sep 22, 2024 09:51 PM IST

मैत्रिणीने बोलणे बंद केल्यामुळे संतापलेल्या तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी मुलीला वाचवायला आलेल्या तिच्या आई-वडिलांवरही आरोपीने हल्ला केला.

तरुणीवर चाकू हल्ला
तरुणीवर चाकू हल्ला

दिल्लीतील रघुबीर नगर भागात एका व्यक्तीने घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. मुलीचा आरडाओरडा ऐकून पीडितेचे आई-वडील तिला वाचवण्यासाठी धावले त्यानंतर आरोपीने तरुणीच्या आई-वडिलांवरही  चाकूने वार केले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. ओरडाओरडा ऐकून शेजारी त्याच्या मदतीला धावले व त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी अभिषेक (२१) याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

पोलिस उपायुक्त विचित्रा वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुणी रघुवीर नगरमध्ये कुटुंबासह राहते. ती राजौरी गार्डनमधील एका सलूनमध्ये काम करते. शनिवारी सकाळी ती आपल्या घरी असताना आरोपी अभिषेक चाकू घेऊन पीडितेच्या घरी पोहोचला. आरोपीने पीडितेशी बोलण्यास सुरुवात केली, त्यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला.

या भांडणादरम्यान आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ला होताच पीडितेने आरडाओरडा सुरू केला. मुलीचा आवाज ऐकून तिचे आई-वडील तिच्याकडे धावले. मुलीवर हल्ला होताना पाहून त्यांनी आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिघांना रुग्णालयात दाखल केले. तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

तपासादरम्यान हा प्रकार पीडितेचा मित्र अभिषेक याने केल्याचे पोलिसांना समजले. तो राजौरी गार्डनमध्ये राहतो. पीडिता आणि आरोपी दोघेही मित्र होते. हे दोघे गेल्या वर्षभरापासून राजौरी गार्डनमधील एका सलूनमध्ये एकत्र काम करत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पीडितेने त्याच्यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. यामुळे वैतागून त्याने तिच्यावर हल्ला केला. 

 पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आणि पीडितेची भेट सलूनमध्येच झाली होती. ज्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. परंतु आरोपीच्या कृत्याने वैतागलेल्या पीडितेने त्याच्यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. आरोपीला ते आवडले नाही. याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. पीडितेच्या मदतीला आलेल्या तिच्या आई-वडिलांनाही त्यांनी सोडले नाही.

Whats_app_banner
विभाग