arvind kejriwal : दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा! कोर्टाने केला जामीन मंजूर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  arvind kejriwal : दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा! कोर्टाने केला जामीन मंजूर

arvind kejriwal : दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा! कोर्टाने केला जामीन मंजूर

Published Mar 16, 2024 12:11 PM IST

arvind kejriwal got bail : सीएम अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

 दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा! कोर्टाने केला जमीन मंजूर
दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा! कोर्टाने केला जमीन मंजूर (PTI)

arvind kejriwal got bail : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना ईडी समन्स प्रकरणी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sanjay Raut : 'मोदी फादर ऑफ करप्शन..' इलेक्टोरल बॉण्डवरून शिवसेनेचा हल्लाबोल

अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना कोर्टातून बाहेर पडता यावे म्हणून बाँडवर निर्णय देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, हा गुन्हा जामीनपात्र आहे, अशा प्रकरणात आरोपीला जामीन दिला जातो.

Madras High Court : आम्ही डोळ्यांवर पट्टी बांधलेली नाही! न्यायाधीशांनी युट्यूबरला फटकारले; ५० लाखांचा ठोठावला दंड

दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज हिल्यांदाच न्यायालयात हजर झाले. यापूर्वी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहिले होते. त्यासाठी त्यांनी दिल्ली विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हवाला दिला होता. काल, दिल्ली सत्र न्यायालयाने ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांनी वैयक्तिक हजेरीतून सूट देण्याची याचिका दाखल केली होती. गुरुवारी आणि शुक्रवारी त्यांच्या याचिकेवर प्रदीर्घ चर्चा झाली. यानंतर, न्यायालयाने समन्सला स्थगिती देण्यास नकार दिला होता आणि म्हटले होते की केजरीवाल इच्छित असल्यास ते ट्रायल कोर्टात अपील करू शकतात.

Asim Sarode : शिंदे गटातील 'हे' आमदार उद्धव ठाकरेंची साथ देण्यास तयार! अ‍ॅड. असीम सरोदे यांनी थेट नावंच सांगितली!

केजरीवाल हे आज न्यायालयात येण्यापूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दिल्ली वाहतूक पोलिसांनीही अनेक मार्ग वळवले होते. सुनावणीदरम्यान अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACMM) दिव्या मल्होत्रा ​​यांनी केजरिवाल यांना जामीन मंजूर केला. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि १ लाख रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने दोन वकील रमेश गुप्ला आणि राजीव मोहन उपस्थित होते.

पुढील सुनावणी १ एप्रिलला

अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता म्हणाले, "आम्ही ट्रायल कोर्टाच्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती. सीएम केजरीवाल आज हजर झाले आणि जामीन स्वीकारण्यात आला. पुढील सुनावणी ही १ एप्रिल रोजी होणार आहे."

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर