Flipkart news : ऑनलाइन शॉपिंग दरम्यान ग्राहकांना चांगली सेवा न देणे तसेच चुकीच्या वस्तु डिलिव्हर करणे फ्लिपकार्टला महागात पडले आहे. ग्राहकांना योग्य सेवा न दिल्याने दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम जिल्ह्यातील ग्राहक मंचाने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट व आणखी एका कंपनीला एकूण किमतीच्या सुमारे १० पट दंड ठोठावला आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये फ्लिपकार्टवर १२९९ रुपये किंमतीच्या ब्लूटूथ हेडफोनची डिलिव्हरी झाल्यानंतर हे प्रकरण सुरू झाले. ग्राहकाणे दुसरी वस्तु ऑर्डर केली होती. मात्र, ती वस्तु त्याला मिळालीच नाही. या प्रकरणी कंपनीकडे तक्रार करून देखील त्यांना प्रतिसात न मिळाल्याने त्यांनी थेट ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली.
ग्राहक मंचाचे अध्यक्ष सुरेश कुमार गुप्ता, हर्षाली कौर आणि रमेशचंद्र यादव यांच्या खंडपीठाने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि हेडफोन निर्मात्याला तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
तक्रारीनुसार, दिल्लीतील नजफगढ येथील रहिवासी असलेल्या ललित कुमार या ग्राहकाने नोव्हेंबर २०२१ मध्ये फ्लिपकार्टकडून ब्लूटूथ हेडसेट खरेदी केला होता. १० नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांना त्यांची ऑर्डर मिळाली. या दरम्यान ते प्रवास करत होते. त्यामुळे त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी पार्सल उघडले. यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी ब्लूटूथ हेडफोन ऑर्डर केले होते. मात्र, पार्सलमध्ये त्यांना ब्लूटूथ हेडफोन ऐवजी वायर्ड हेडफोन आढळले. तक्रारदाराने तत्काळ ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मकडे ही वस्तु परत येण्याची विनंती केली, परंतु कंपनीने ती नाकारली.
शॉपिंग प्लॅटफॉर्म कंपनीने ४८ तासांनंतर माल परत घेण्याची त्यांची विनंती फेटाळून लावली होती. मात्र, हे उत्पादन दुसऱ्या विक्रेत्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना पाठवण्यात आल्याचे शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने सांगितले. उत्पादन बदलण्याचा त्यांचा अर्ज कंपनीनेच फेटाळून लावला होता. दरम्यान, कोर्टाने सर्व बाजू तपासल्या. यात कंपनी दोषी असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी ग्राहकाला दिलासा देत फ्लिपकार्ट व हेडसेट कंपनीला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला आहे.