मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal ED Custody : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ७ दिवसांची ईडी कोठडी

Arvind Kejriwal ED Custody : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ७ दिवसांची ईडी कोठडी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 22, 2024 09:09 PM IST

Arvind kejriwal ED Costody : दिल्लीतील राउज एवेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सात दिवसांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवले आहे.

अरविंद केजरीवाल यांना ७ दिवसांची ईडी कोठडी
अरविंद केजरीवाल यांना ७ दिवसांची ईडी कोठडी

Arvind Kejriwal Arrested: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Arrest) यांना कथित दारू धोरण घोटाळ्यात (Delhi Liquor Policy Case) दिल्लीतील राउज एवेन्यू कोर्टाने सात दिवसांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवले आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी शुक्रवारी विरोध प्रदर्शन केला. या आंदोलनामुळे दिल्लीतील आयटीओ आणि आम आदमी पार्टीचे कार्यालय आणि भाजप कार्यालयाच्या बाहेर बॅरिकेडिंग करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 

IPL_Entry_Point

विभाग