Viral News : भारताची बदनामी ऐकून कॅब ड्रायव्हरला राग आला! पाकिस्तानी नागरिकाला शिकवला चांगलाच धडा, वाचा-delhi cab driver kicked out pakistani citizen and his girlfriend of his car for calling indians selfish video goes viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : भारताची बदनामी ऐकून कॅब ड्रायव्हरला राग आला! पाकिस्तानी नागरिकाला शिकवला चांगलाच धडा, वाचा

Viral News : भारताची बदनामी ऐकून कॅब ड्रायव्हरला राग आला! पाकिस्तानी नागरिकाला शिकवला चांगलाच धडा, वाचा

Aug 13, 2024 09:24 AM IST

Delhi Viral news : दिल्लीतील एका कॅब ड्रायव्हरने एका पाकिस्तानी नागरिकाला आणि त्याच्या मैत्रिणीला भारताबद्दल भारतातच वाईट बोलल्याबद्दल चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

भारताची बदनामी ऐकून कॅब ड्रायव्हरला राग आला! दिल्लीत पाकिस्तानी नागरिकाला शिकवला चांगलाच धडा, वाचा
भारताची बदनामी ऐकून कॅब ड्रायव्हरला राग आला! दिल्लीत पाकिस्तानी नागरिकाला शिकवला चांगलाच धडा, वाचा

Delhi Viral news : भारतात येऊन भारतीयांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला एका कॅब चालकाने चांगलाच धडा शिकवला आहे. ही घटना दिल्ली येथे घडली आहे. गाडीत असतांना भारताविरोधात चुकीचे शब्द वापरल्याने संतप्त झालेल्या कॅब चालकाने रात्री दीडच्या सुमारास एका पाकिस्तानी नागरिकाला व त्याच्या मैत्रिणीला रस्त्याच्या मधोमध सोडून दिले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. नेटकऱ्यांनी कॅब चलकाच्या कृतीचे समर्थन केले आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कारमध्ये बसलेला पाकिस्तानी वंशाचा माणूस आणि कॅब ड्रायव्हर आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्यात बाचाबाची होत असल्याचं दिसतं. यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला जातो. कॅब चालकाने संतप्त होऊन दोघांनाही रस्त्याच्या मधोमध उतरवतांना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ राजधानीच्या कोणत्या भागातील आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

अनेक सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी हा व्हिडिओ 'एक्स'वर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ १ मिनिट आणि १७ सेकंदाचा आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की कॅब चालकाने सुरुवातीला दिल्ली आणि भारतीयांबद्दल चांगले-वाईट बोलण्यास पाकिस्तानी नागरिकाला विरोध केला, परंतु जेव्हा कारमध्ये बसलेले पाकिस्तानी नागरिकाने भारत आणि भारतीयां बद्दल आणखी चुकीचे वक्तव्य केल्याने कॅब चालकाला राग आला. तो त्याच्याशी वाद घालू लागला. पाकिस्तानी नागरिक भारतीय आणि दिल्लीकरांना स्वार्थी म्हणत होता. यामुळे वाद आणखीनच वाढला. ड्रायव्हरने सुरुवातीला दोघांना समज देत असे अपशब्द वापरू नका असे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानी नागरिक वाईट बोलत राहिल्याने कॅबचालक इतका संतापला की त्याने मध्यरात्री दोघांनाही रस्त्याच्या मधोमध कारमधून खाली फेकून दिले.

यानंतरही काही काळ दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर पाकिस्तानी नागरिकाने व्हिडिओ करत बघा हा मोदींचा भारत आहे, इथे कॅब चालक नागरिकांना रात्री मध्येच उतरवं सोडून जातात. हे वाक्य ऐकून कॅब चालकाने देखील दोघांनवर तोंडसुख घेलते. व दोघांना तिथेच सोडून तो निघून गेला. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कॅब चलकाचे कौतुक केले आहे. तसेच तो खरा देशप्रेमी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

विभाग